Jeet Arolkar
Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील गटार सफाई रखडली; पंचायत सचिवांना मेमो द्या !

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी येथील तालुक्यातील विविध खाते प्रमुखांची बैठक घेऊन मॉन्सून पूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी मतदारसंघातील पंचायतीत अद्याप गटार उपसण्याचे काम हाती घेतले नसल्याने संबंधित पंचायत सचिवांना मेमो देण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिला.

या बैठकीला पेडणे तालुका गट विकास अधिकारी केदार,तुये आरोग्य केंद्राच्या अधिकारी विद्या परब,पाणी पुरवठा खात्याचे मुख्य अभियंता सोमा नाईक, सहाय्यक अभियंता संदीप मोरजकर, फडते, गौरीश, जलस्त्रोत खात्याचे अधिकारी सत्यवान नाईक, तुये विभागीय वनधिकारी गौरीश बांदेकर,वीज खात्याचे अभियंता विलसन, वाटू सावंत, कानोलकर, अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर ,यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने पूरग्रस्त परिस्थिती चा सामना करणारी सरकारी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले.त्यासाठी नियोजन करण्याची जबाब दारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सोपविण्यात आली त्यासाठी खास समितीची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले.

दरवर्षी पार्से पंचायत क्षेत्रातील वाय डोंगर ,सोनये तुये ,पार्से मोरजी मांद्रे, केरी यभागात उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर उपाययोजनेसाठी आवश्यक मनुष्यबळ निर्मिती,आवश्यक निधी ,आवश्यक साधन सुविधा निर्माण करण्यावर चर्चा झाली.

पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक कामे हाती घेण्याचे आदेश देण्यात आले. मान्सूनपूर्व कामांमध्ये वीजतारांना स्पर्श करणारी झाडे झुडपे तोडण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पंचायत सचिवांपासून तलाठी तसेच अन्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली.

तसेच पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खाते,पंच सरपंच यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम खाते, जलसिंचन खाते,वीज खाते आदी अत्यावश्यक सेवा असल्याने या खात्यातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर आमदार जीत आरोलकर यांनी येथील मामलेदार अनंत मलिक यांना तशी सूचना केली. पेडणे येथील शासकीय विश्रामधामात ही बैठक घेण्यात आली.

तालुक्याच्या पाणीप्रश्‍नी गंभीर चर्चा

या बैठकीत प्रामुख्याने पाणी प्रश्नावर गंभीर चर्चा झाली.संपूर्ण पेडणे तालुका तिलारी आणि चांदेल पाणी प्रकल्पावर अवलंबून आहे.सध्या चांदेल प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या कळणे नदीवर महाराष्ट्र हद्दीत बंधारा घालण्यात येत असल्याने पेडणे तालुक्यात पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होणार आहे. बैलपार पाणी प्रकल्प तसेच हळर्ण धुमासे येथील नदीवर अर्धवट असलेल्या पंप हाऊस तसेच धुमासे अपूर्ण बंधारा यावर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आले. तालुक्याचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते अधिकाऱ्यांनी तातडीने करावे, अशा सूचना आमदार आरोलकर यांनी दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT