Goa Sesa Workers Dainik Gomantak
गोवा

Goa Sesa Workers : खाण व्यवसाय सुरळीत करण्यास सहकार्य करा

‘वेदांता’च्या कामगारांचे पंचायतीला साकडे

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim: खाण व्यवसाय सुरळीतपणे सुरू करण्यास सहकार्य करा, असे साकडे ‘वेदांता’ने सामावून घेतलेल्या पूर्वाश्रमीच्या सेझा कामगारांनी शिरगाव पंचायतीला घातले आहे. डिचोली खाण ब्लॉकची बोलीदार असलेल्या वेदांता कंपनीने खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी वेदांता कंपनीने जोरदार तयारी सुरू केली असून, पूर्वाश्रमीच्या सेझाच्या ९३ कामगारांना सेवेत सामावून घेतले आहे.

सेवेत सामावून घेतलेले पूर्वाश्रमीचे सेझाचे ९३ कामगार आता पंचायतींकडून पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आत्माराम तिळवे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी या कामगारांनी शिरगाव पंचायतीत जाऊन सरपंच करिश्मा गावकर यांच्यासह सूर्यकांत पाळणी आणि वेदिका शिरगावकर यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून खाण व्यावसाय सुरू करण्यास पंचायतीने सहकार्य करावे, अशी मागणी केली.

सकारात्मक प्रतिसाद

सरपंच गावकर आणि इतर पंचसदस्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती या कामगारांनी दिली. डिचोली खाण ब्लॉकअंतर्गत येणाऱ्या भागातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी खाण व्यवसाय सुरू होणे अत्यावश्यक आहे, असे मत पंचसदस्य सूर्यकांत पाळणी यांनी व्यक्त केले.

तसेच त्यांनी कामगारांना सेवेत सामावून घेतल्याबद्दल वेदांता कंपनीसह कामगारांचेही अभिनंदन केले आहे, अशी माहिती कामगारांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT