Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचा वापर सरकारने कंत्राटदारांच्या बिलासाठी केला; विजय सरदेसाईंचा आरोप

विजय सरदेसाई यांचा गोवा सरकारच्या सोडले टीकास्त्र

दैनिक गोमन्तक

मडगाव: मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना दयानंद निराधार योजनेखाली ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन दिले जायचे. हे पैसे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा व्हायचे. मात्र आताचे राज्य सरकार हे पेन्शन पाच सहा महिने अडकवून ठेवते आहे.

(goa senior citizens pension misused alleges Vijai Sardesai)

ज्येष्ठ नागरिकांप्रती दाखविलेली सरकारची ही असंवेदशीलता असल्याचा आरोप त्यांनी केला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज मडगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरदेसाई बोलत होते. या सरकारच्या समाजकल्याण खात्याला ज्येष्ठ नागरिकांप्रती काहीच वाटत नाही. असा ही आरोप त्यांनी केला.

ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचे पैसे कंत्रादारांची बिले फेडण्यासाठी वापरले जातात. कारण या कंत्रादारांकडून काही जणांना कमिशन मिळते. त्यासाठीच ज्येष्ठांची परवड केली जाते, असा आरोप सरदेसाई यांनी केला. समाजकल्याण खात्यावर ताशेरे ओढताना सरदेसाई म्हणाले, वृद्धाश्रमात काहींचा पगार चार हजारावरुन अडीच हजारावर आणण्याचे ठरले आहे, आणि साफसफाई करणाऱ्यांना अडीच हजार मानधन मिळत होते ते दीड हजारांवर आणू पाहत आहे.

एका बाजूने महागाई वाढत असताना मानधन वाढविण्याचे सोडून हे सरकार त्यांचा पगार कमी करू पाहत आहे. तर दुसऱ्या बाजूने मंत्र्यांच्या वाशिल्याच्या माणसांची सरकारी नोकर म्हणून भरती करून बेकार रहाणाऱ्या कामगारांची फौज तयार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर विजय सरदेसाई यांना कसे प्रतिउत्तर मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT