Scrub Typhus Spread In goa Dainik Gomantak
गोवा

Scrub Typhus Spread In goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

scrub typhus spread in goa study: गोव्यात स्क्रब टायफसचा फैलाव होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात तपासलेल्या २,८१५ नमुन्यांपैकी ८२७ नमुने बाधित आढळले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्यात स्क्रब टायफसचा फैलाव होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात तपासलेल्या २,८१५ नमुन्यांपैकी ८२७ नमुने बाधित आढळले. हे प्रमाण २९.३८ टक्के आहे. तिसवाडी आणि मुरगाव तालुक्यांत रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासात नमूद केले आहे.

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकात ऑक्टोबरमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला. जुलै ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यांत रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचेही आढळले आहे. स्क्रब टायफस हा संक्रमित कीटकाच्या अळीच्या दंशामुळे होतो. हा आजार व्यक्तीकडून व्यक्तीकडे पसरत नाही. ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि पुरळ ही प्रमुख लक्षणे आहेत. दंश झालेल्या ठिकाणी काळसर खपलीसारखी खूण दिसू शकते. सुरुवातीची लक्षणे डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिससारखी असल्याने निदानास विलंब होण्याची शक्यता असते.

वेळीच उपचार न घेतल्यास रक्तस्राव, मेंदूला सूज आणि अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. या आजारावर उपचार उपलब्ध असले, तरी प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. बाधितांपैकी ८०.१७ टक्के रुग्ण १८ ते ६० वर्षे वयोगटातील, तर ६४.४५ टक्के पुरुष होते. त्यामुळे शेतकरी आणि बाहेरच्या परिसरात काम करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात तापाच्या रुग्णांची तपासणी करताना स्क्रब टायफसचाही विचार करावा, अशी शिफारस अभ्यासकांनी केली आहे.

तापाकडे दुर्लक्ष करू नका!

हेल्थवे रुग्णालयाचे (Hospital) वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विजय नाईक यांनी ताप आल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले. गवताळ भागात किंवा शेतात काम केल्यानंतर ताप आल्यास डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी. ताप दोन ते तीन दिवस टिकल्यास किंवा त्यासोबत डोकेदुखी, अंगदुखी अथवा पुरळ असल्यास तपासणी करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sarmanas Villagers Protest: ‘वेदान्ता’ची खनिज वाहतूक रोखली! सारमानसवासीय पुन्हा आक्रमक; चार तास वाहतूक ठप्प

CENA IS BACK.... WWE चाहत्यांसाठी मोठी बातमी! जॉन सीनाच्या कमबॅकची घोषणा; RAW मध्ये दिसणार 16 वेळचा 'वर्ल्ड चॅम्पियन'

Prepaid Smart Meters: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरुपी बंद करा! अमित पाटकरांचा वीज खात्याला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Margao October Heatwave: मडगावकरांचा ऑक्टोबर हिटने काढला घाम! पारा 37.7 अंशांवर, अवघ्या दोन तास चाळीस मिनिटांत तापमानात तीन अंशांची वाढ

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ८व्या वेतन आयोगाचे 5 महत्त्वाचे अपडेट्स; पगारवाढीचा अंतिम निर्णय कधी होणार?

SCROLL FOR NEXT