Goa Science Festival 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Science Festival : विज्ञान समाजापर्यंत पोचणे आवश्‍‍यक : प्रो. सुनील कुमार सिंह

मिरामार येथे गोवा विज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Science Festival : विज्ञान आणि समाज एकमेकांबर अवलंबून आहे. देशाच्या विकासासाठी, आत्मनिर्भरतेसाठी नागरिकांना विज्ञानाचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. विज्ञानाने केलेली प्रगती, तसेच त्याचे फायदे आदींची माहिती केवळ वैज्ञानिकांपर्यंत सीमित न राहता ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंह यांनी केले.

मिरामार विज्ञान केंद्रात विज्ञान महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यात सिंह बोलत होते. यावेळी फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रॉलॉजीचे अध्यक्ष सतीश नायक व कार्यक्रम समन्वयक विलास चौधरी उपस्थित होते.

जे पुस्तकांमध्ये आहे तेवढेच विज्ञान नाही. आई जे जेवण बनविते, ते देखील विज्ञान आहे. कुतुहलाने पाहिल्यास विज्ञानाचे महत्त्व समजेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलपेक्षा पुस्तके वाचली पाहिजेत, असे नायक म्हणाले.

"विजेमुळेही अनेक समस्‍या निर्माण होत असतात. दरवर्षी जगभरात पाच अब्ज दूरध्वनींचे उत्पादन केले जाते. त्याच्या निर्मितीसाठी सोने, चांदी तसेच इतर दुर्मीळ खनिजांचा वापर केला जातो. आपल्याकडे ही खनिजे नसतील तर इतर देशांवर अवलंबून रहावे लागते. आम्ही पेट्रोलियम उत्पादनांसाठी इतरांवर अवलंबून आहोत. यासाठी विज्ञान आणि समाज एकत्र येऊन त्‍यावर चर्चा होणे गरजेचे आहे."

- प्रो. सुनील कुमार सिंह, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT