Goa Scholarships For ST Students:
Goa Scholarships For ST Students: Dainik Gomantak
गोवा

Goa Scholarship: एसटी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप; अर्ज करण्याची अंतिम तारीख घ्या जाणून...

Akshay Nirmale

Goa Scholarships For ST Students: गोवा सरकारच्या आदिवासी विकास संचलनालयातर्फे एसटी समुदायातील विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप देण्यात येते. या स्कॉलरशिपसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

त्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (https://scholarships.gov.in) वर अर्ज करायचा आहे.

या शिष्यवृत्ती केंद्र सरकार पुरस्कृत आहेत. पैकी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

संचलनालयाने या स्कॉलरशिपसाठी अर्जाची मुदत वाढवली आहे. प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सन 2023-24 साठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 अशी आहे. आयएनओ लेव्हल व्हेरिफिकेशनची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. तर डिस्ट्रिक्ट लेव्हल व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत 1 मार्च 2024 आहे.

नवी दिल्लीतील आदिवासी मंत्रालयाने याबाबत काही निर्णय घेतले आहेत. अर्जासाठी अर्जदार आणि पालकांचेही आधार कार्ड गरजेचे आहे. आधार पेमेंट ब्रिजद्वारे शिष्यवृत्तीची रक्कम बँकेत जमा केली जाईल. त्यासाठी बँक अकाऊंट आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदींना निमंत्रण

SCROLL FOR NEXT