Goa ST Political Reservation Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation: आमच्यामुळे शिष्टमंडळ दिल्लीत गेले RG चा दावा; वेळीप म्हणाले, 'आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर...'

Goa ST Political Reservation: आरक्षण मिळवण्यासाठी केवळ विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अद्याप मिळालेली आहे. मात्र, याचे श्रेय घेण्यावरूनच आता चढाओढ सुरू झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa ST Political Reservation

लोकसभा निवडणुकीमध्ये आदिवासी समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरणार हे आताच पुरेसे स्पष्ट होऊ लागले आहे. हे आरक्षण मिळवण्यासाठी केवळ विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अद्याप मिळालेली आहे. मात्र, याचे श्रेय घेण्यावरूनच आता चढाओढ सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात आदिवासी राजकीय आरक्षणासाठी मतदारसंघ फेररचना विधेयक मांडण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर भाजपच्या पणजीतील कार्यालयात मुख्यमंत्र्यांना आदिवासी नेत्यांकडून पेढे भरवण्याचाही कार्यक्रम भाजपने घडवून आणला.

आदिवासी नेत्यांना आपली फसवणूक झाली असे वाटत असतानाच आता दिल्लीतील या कामगिरीचे श्रेय घेण्यासाठी रेव्हॉल्युशनरी गोवन्स (RG) पक्ष पुढे आला आहे. त्याला आदिवासी नेत्यांनीच आता प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. यावरून या लोकसभा निवडणुकीमध्ये आदिवासी राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापणार हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

'अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्याचे सांगून भाजप एसटी मोर्चाचे नेते समाजाची दिशाभूल करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाही. आरजीपीने मिशन राजकीय आरक्षणाला पाठिंबा दिल्याने सरकारला शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जावे लागले,' असा दावा आरजीचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट परेरा यांनी केला.

तर, 'गेल्या दोन वर्षांपासून आम्ही राजकीय आरक्षणासाठी लढत आहोत. वेंझी, विजय, यूरी यांनी आमचा मुद्दा विधानसभेत मांडला. तेव्हा वीरेश यांनी मौन बाळगले. आरजीपी केवळ राजकीय फायदा उठवू पाहात आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आरजीपी आम्हाला पाठिंबा देईल का?' असा सवाल एसटी नेते रुपेश वेळीप यांंनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT