Goa SC ST scholarship Dainik Gomantak
गोवा

विदेशी शिक्षणापासून आदिवासी विद्यार्थी वंचितच! 10वर्षांत एकालाही नाही लाभ; अंमलबजावणीकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष

Goa SC ST scholarship: स्कॉलरशिप योजना अस्तित्वात असूनही राज्यातील अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ न घेतल्याची वस्तुस्थिती सरकारने तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील अनुसुचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठीचा निधी मोठ्या प्रमाणात वापरला गेला असला तरी, विदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी असतानाही १० वर्षात त्या सुविधेचा लाभ एकाही विद्यार्थ्याने घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना अस्तित्वात असूनही राज्यातील अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ न घेतल्याची वस्तुस्थिती सरकारने तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

सामाजिक कल्याण संचालनालयाच्या माहितीनुसार, अनुसुचित जाती प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी केंद्राकडून २०२२-२३ मध्ये १०८.१८ लाख, २०२३-२४ मध्ये ५२.५० लाख व २०२४-२५ मध्ये ३५.९६ लाख रुपये प्राप्त झाले आणि हा सर्व निधी १०० टक्के वापरला गेल्याची नोंद आहे.

त्याचप्रमाणे अनुसुचित जाती पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी २०२२-२३ मध्ये ११८७.२२ लाख, २०२३-२४ मध्ये ५२६.५४ लाख व २०२४-२५ मध्ये ५०० लाख रुपये मिळून ते पूर्णपणे खर्च झाल्याचे अहवाल स्पष्ट करतो. २०२०-२१ ते २०२४-२५ दरम्यान प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीत दरवर्षी ५ ते २१ विद्यार्थ्यांना तर पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीत २१ ते १७९ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचे आकडे देण्यात आले आहेत.

२०२१-२२ मध्ये पोस्ट-मॅट्रिक योजनेत १७९ विद्यार्थ्यांना सुमारे २८.२० लाख तर २०२०-२१ मध्ये ६६ विद्यार्थ्यांना १४.९१ लाख इतकी आर्थिक मदत वितरित झाल्याचे अहवालात नमूद आहे.

दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी कल्याण संचालनालयाच्या प्री व पोस्ट-मॅट्रिक योजनांद्वारे दर महिन्याला शेकडो रुपयांचा स्टायपेंड, पुस्तक अनुदान, तसेच व्यावसायिक व इतर अभ्यासक्रमानुसार ३ ते १२ हजार रुपयांपर्यंत वार्षिक साहाय्य देण्यात येत असल्याचे तपशीलवार वर्णन अहवालात आहे.

याशिवाय राज्य पुरस्कृत प्री-मॅट्रिक, ‘विद्या लक्ष्मी’, ‘होम नर्सिंग स्कॉलरशिप’, ‘गगन भरारी शिक्षण योजना’ इत्यादी योजनांमधूनही आदिवासी विद्यार्थ्यांना तरुणांना वेगळे अनुदान व प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

केंद्राच्या प्रश्नावर राज्य सरकारचे उत्तर...

गत १० वर्षांत अनुसुचित जाती, जमाती घटकांतील किती गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना भारतात व विदेशात उच्च शिक्षण किंवा संशोधनासाठी मोफत प्रायोजित केले?” या केंद्र सरकारच्या प्रश्नाला राज्य सरकारने थेट “नाही” असे उत्तर दिले आहे. म्हणजे संपूर्ण दशकात गोव्याहून एकही अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमाती विद्यार्थ्याला राज्य सरकारच्या माध्यमातून परदेशी मास्टर्स, पीएचडी किंवा पोस्ट-डॉक्टरल अभ्यासक्रमासाठी पाठवण्यात आले नाही, अशी अधिकृत नोंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

SCROLL FOR NEXT