Goa villagers ban tourists Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Place Ban: गोव्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांना बंदी! ग्रामस्थांनी घेतला निर्णय; कचरा, धांगडधिंग्यामुळे ठराव मंजूर

Goa villagers ban tourists: नदीत टाकलेल्या बाटल्या फुटून काचा किनाऱ्यावर व पाण्यात विखुरलेल्या आढळतात. पावसाळ्यात या काचा प्रवाहाबरोबर शेतांमध्ये जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beach Entry Ban : सत्तरी तालुक्यातील गोळावली-ठाणे येथील बंधारा परिसरात पर्यटकांकडून वाढत चाललेल्या अस्वच्छता आणि धांगडधिंगा प्रकारांमुळे ग्रामस्थांनी पर्यटकांना तेथे प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती पंचसदस्य सुभाष गावस यांनी दिली.

उन्हाळ्यातही गोळाली-ठाणे येथील बंधारा वाहत असतो. त्‍यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी अनेकजण कुटुंबीय व मित्रमंडळींसह येथे येतात. मात्र काही पर्यटकांकडून मद्यप्राशन करून बिअर व दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा तसेच इतर पदार्थ नदी व परिसरात टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी परिसर अस्वच्छ होत असून ग्रामस्थ, महिला व मुलांसाठीही धोका निर्माण झाला आहे.

नदीत टाकलेल्या बाटल्या फुटून काचा किनाऱ्यावर व पाण्यात विखुरलेल्या आढळतात. पावसाळ्यात या काचा प्रवाहाबरोबर शेतांमध्ये जातात. त्यामुळे नदीकिनारी कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांना इजा होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सर्वत्र प्‍लास्‍टिकचा खच

स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्‍यात आला. त्‍यात बिअर, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्‍लास्‍टिक पिशव्या व इतर टाकाऊ कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. नदीकिनारा व परिसराची साफसफाई करण्‍यात आली.

ग्रामस्थांचा इशारा

पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी

नियमभंग करणाऱ्यांची पोलिसांत तक्रार

पर्यावरण व जलस्रोत संरक्षणावर भर

निसर्ग, पर्यावरण स्वच्छ ठेवण्‍याचा संदेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT