Stray Cattle In Sattari Dainik Gomantak
गोवा

Stray Cattle In Sattari: वाळपईत वाहनचालकांसमोर उद्भवलीय 'ही' समस्या, आठवडी बाजारातही सहन करावा लागतोय त्रास

एवढ्या मोठ्या प्रमाणात भटकी गुरे येतात तरी कुठून हाच प्रश्न लोकांना पडला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Stray Cattle In Sattari सत्तरी तालुक्यातील विविध भागात दिवसें दिवस भटक्या गुरांची समस्या जटील होत चालली आहे. वाळपई शहरात, ग्रामीण भागात सकाळ रात्री रस्त्यावर भटकी गुरे आढळून येतात. वेळूस नगरगाव मुख्य रस्त्यावर, रात्रीच्यावेळी कदंब बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर गुरांचा कळप रस्त्यावर बसलेला असतो.

हा कळप वाहन चालकांना त्रासादायक ठरत आहे. विशेष म्हणजे वाळपईत मंगळवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी ग्राहक व व्यावसायिकांना मोकाटपणे फिरत असलेल्या गुरांचा त्रास होत असतो.

दर मंगळवारी हे नेहमीचेच चित्र बनले आहे. वाळपईत मंगळवारी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिक दाटी वाटीने आपापली दुकाने थाटून बसलेले असतात. त्या गुरांचा फटका दुकानदारांना बसतो.

भटकी गुरे रस्त्यात मधूनच फिरत असतात. त्यावेळी फळ, पालेभाज्यांवर ताव मारतात. परिणामी व्यावसायिकांचा विक्रीसाठी आणलेला माल खराब होतो. अशा भटक्या गुरांना वारंवार व्यावसायिक, नागरिक हाकलत असतात.

वाळपई पालिकेने मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी तरी अशा भटक्या गुरांना या बाजाराच्या जागेत जाता येणार नाही,असा उपाय हाती घेतला पाहिजे. पण त्या गुरांवर नियंत्रण आणण्यात पालिकेला अपयश आलेले आहे.

एखाद्यावेळी ग्राहकांनी खरेदी केलेल्या भाजी ही गुरे खाण्यासाठी धावतात. परिणामी ग्राहकांनाही नुकसान सोसावे लागते आहे. दोन मोकाट गुरे एकमेकांशी भांडतात, तेव्हांही लोकांना त्रास होतो.

वाळपई वेळूस येथे कदंब बसस्थानकासमोरच्या रस्त्यावर दररोज भटक्या गुरांचा कळप बसलेला असतो. भटक्या गुरांनी रस्त्यातच ठाण मांडल्याने अपघाताचे प्रकारही होत आहेत. त्यात गुरे जखमी होण्याच्या घटनाही घडतात.

एवढी गुरे येतात तरी कुठून ?

एवढ्या मोठ्या प्रमाणात भटकी गुरे येतात तरी कुठून हाच प्रश्न लोकांना पडला आहे. संबंधित गुरांचे मालक तरी कुठे असतात. हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. रस्त्यावर अनेक प्रकारचा प्लास्टिक कचरा पडलेला असतो.

प्रसंगी अशी भटकी गुरे हे प्लास्टिक खातात. पण नंतर हळूहळू पोटात प्लास्टिक जमा होऊन गुरे दगावण्याचे प्रकार वाढलेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्लास्टिक खाल्याने मोकाट गुरे दगावण्याचे प्रकार वाढलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT