Tiatrist Francis the Tue Dainik Gomantak
गोवा

Goa: समाधानकारक भरपाई द्या; 10 हजारांची भीक नको: फ्रान्सिस द तुयेंची मागणी

ज्या दिवशी हा व्हिडीओ प्रसारित झाला त्याच रात्री नाईक (Rajdeep Naik) यांच्या गाडीची काच कुणी अज्ञातांनी फोडल्याने हा राजकिय चर्चेचा विषय झाला होता.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कोविड महामारीच्या (Covid 19) काळात रोजगार गमावलेल्या कलाकारांना गोवा सरकारतर्फे (Goa Government) देण्यात येणाऱ्या 10 हजारांच्या एकरकमी नुकसान भरपाईच्या विरोधात आता नाट्य कलाकार राजदीप नाईक (Rajdeep Naik) यांच्यानंतर प्रसिध्द तियात्रिस्त फ्रान्सिस द तुये (Tiatrist Francis the Tue) यांनीही आवाज काढला असून, देतात तर व्यवस्थित भरपाई द्या, 10 हजारांची भीक देऊ नका असे त्यांनी सरकारला उद्देशून म्हटले आहे.

सध्या कला व संस्कृती खात्याने जाहीर केलेल्या या योजनेला कलाकारांकडून विरोध होत असून यावर सर्वात प्रथम नाट्य कलाकार राजदीप नाईक यांनी एक निषेधाचा व्हिडीओ व्हायरल करुन ही 10 हजारांची भीक तुमच्याकडेच ठेवा असे म्हटले होते. ज्या दिवशी हा व्हिडीओ प्रसारित झाला त्याच रात्री नाईक (Rajdeep Naik) यांच्या गाडीची काच कुणी अज्ञातांनी फोडल्याने हा राजकिय चर्चेचा विषय झाला होता.

आता फ्रान्सिस द तुये यांनी नाईक यांना पाठींबा देण्याचा एक नवीन व्हिडीओ प्रसारित करताना, मागचे दीड वर्ष गोव्यातील व्यावसायिक कलाकार काम नसल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा वेळी त्यांना आधार करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी बनते. अशावेळी सरकार आम्हाला 10 हजारांची एकरकमी भरपाई देऊ पहाते ती या पावसात चणे कुरमुरे खाण्यासाठी का असा सवाल त्यांनी केला आहे.

फ्रान्सिस द तुये हे प्रसिद्ध तियात्र कलाकार असून ते आपल्या राजकीय विडंबनात्मक गीतासाठी प्रसिद्ध आहेत. तमाम नाट्य आणि तियात्र कलाकारांच्या वतीने त्यांनी हा व्हिडीओ प्रसारित करताना, सरकारकडे आम्ही मदत मागतो ती आमच्या अधिकाराने. यापूर्वी आम्हीच सरकारी नाट्यगृहे भाड्याने घेऊन तसेच करमणूक कर भरून सरकारी तिजोरीत महसूल जमा केला आहे. आता आम्ही अडचणीत आहोत त्यावेळी सरकारने आम्हाला मदत करावी अशी आमची माफक अपेक्षा आहे असे त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT