Toilet Day |Goa News  Dainik Gomantak
गोवा

World Toilet Day 2022: सत्तरीतील ग्रामीण भागात शौचालयांचा वापर कमी...

World Toilet Day 2022: दरवर्षी प्रत्येक प्रभागात योजनेअंर्तगत गरिबांसाठी 5 ते 7 शौचालये बांधतो.

दैनिक गोमन्तक

World Toilet Day 2022: सत्तरीत एकूण 90 टक्के नागरिक शौचालयांचा वापर करतात. तसेच इतर ग्रामीण भागात अजूनपर्यंत काही नागरिक उघड्यावर शौच करतात. गेल्या वर्षी सत्तरी तालुक्यातील 12 पंचायतींत गोवा वेस्ट मॅनेजमेंट योजनेअंतर्गत (पीडब्ल्यूडी) सुमारे 2474 शौचालयांची सुविधा नागरिकांना प्राप्त झाली आहे.

त्यात भिरोंडा 199, खोतोडा 205, ठाणे-डोंगुर्ली 128, गुळेली 128, होंडा 328, म्हाऊस 95, मोर्ले 223, नगरगाव 179, पिसुर्ले 183, पर्ये 329, केरी 240, सावर्डे २३७ शौचालये बांधण्यात आलेली आहेत. तसेच अजून सत्तरीतील सर्व पंचायतींतून सुमारे 1200च्या वर नवीन शौचालयांसाठी अर्ज करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात 2,474 बायोडायजेस्ट शौचालये उभारण्यात आलीत.

ग्रामस्थांचे पैसे परत करा

जेव्हा गोवा वेस्ट मॅनेजमेंट योजनेअंतर्गत ही योजना अमलात आणली गेली तेव्हा सत्तरीतून एकूण 2,474 जणांनी याचा लाभ घेतला. त्यावेळी नागरिकांनी हे सर्व पैसे भरले होते. मात्र, ज्या नागरिकांनी जास्त पैसे भरले होते. त्या नागरिकांचे पैसे सरकारतर्फे अजूनपर्यंत परत करण्यात आलेले नाहीत. पैसे परत करा, अशी मागणी नागरिक करतात.

"दरवर्षी प्रत्येक प्रभागात योजनेअंर्तगत गरिबांसाठी 5 ते 7 शौचालये बांधतो. ज्या कुटुंबांना खरीच गरज आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला गातो. आताही नवीन अर्ज आलेले आहेत. तसेच काहींचे जुने व मोडकळीस आलेले शौचालयही दुरुस्त करून दिलेले आहेत."

- सेहझीन शेख, वाळपई नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT