Goa Panchayat: अनेक वर्षांपासून विकासकामांपासून अलिप्त असलेल्या आगोंद पंचायत क्षेत्रातील विकासकामांना चालना देण्यासाठी प्रत्येक प्रभागातील प्रमुख स्थानिक नागरिकांची बैठक सोमवार, 3 रोजी सेंट ॲनिस विद्यालयाच्या सभागृहात सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच फातिमा रॉड्रिग्स यांच्या प्रयत्नांतून यशस्वीरीत्या पार पडली.
यावेळी स्थानिक चर्चचे फादर पेट्रीक लुईस, उपसरपंच प्रीतल फर्नांडिस, पंचसदस्य करुणा फळ देसाई, जॉन फर्नांडिस, केनिशा फर्नांडिस, नीलेश पागी, रामनाथ वेळीप, माजी सरपंच शाबा नाईक गावकर, जोवी फर्नांडिस, काशिनाथ फळदेसाई, नारायण देसाई, किरण नाईक गावकर, नवनाथ सावंत, नितीन नाईक गावकर, सूरज नाईक गावकर, प्रकाश फळ देसाई व अन्य 35 प्रमुख नागरिक उपस्थित होते.
तसेच, यावेळी ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यांची होत असलेली धूप, टॅक्सी चालकांकरता टॅक्सी स्थानक, शॅक्सचालकांना कायम पर्यटन दाखला, समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी रस्ता, वीज, पाणी, आरोग्य उपकेंद्रात कायम डॉक्टर अशा मागण्या तसेच काही सूचना केल्या.
समुद्रकिनारे व अन्य ठिकाणी होत असलेली अमली पदार्थ विक्री कायमची बंद करण्यासंबंधीच्या चर्चेसंदर्भात परत एकदा सर्व अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सभापती तवडकर यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.