Sakhli pamping Dainik Gomantak
गोवा

Goa sanqualim Monsoon 2023 : साखळी शहरात पूरस्थितीची भीती; बाजारातील पाणी बाहेर फेकण्यासाठी पंपिंग प्रक्रिया सुरू

पूरप्रतिबंधक यंत्रणा सज्ज ः पंपिंग प्रक्रिया सुरूच; नदीचे पाणी पात्राबाहेर

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी : राज्यभरात सध्या सर्वत्रच कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्यांच्या पातळीत बरीच वाढ झाली आहे. साखळीतील वाळवंटी नदीचीही पातळी बरीच वाढली असून गुरूवारी संध्याकाळी बाजारातील पाणी बाहेर फेकण्यासाठी पंपिंग प्रक्रिया सुरू होती. दोन पंप सुरू करण्यात आले होते. सध्या नदी दुथडी भरुन वाहत आहे. पावसाचा मारा सतत सुरूच राहिल्यास साखळी व परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.

goa sakhli monsoon heavy rain water river overflow fear of flood situation in the chain and area.

साखळीतील वाळवंटी नदीची पातळी गुरुवारी संध्याकाळी ३ मीटरपर्यंत पोहोचली होती. तसेच बाजारातील नाल्याची पातळीही ३ मीटरच होती. त्यामुळे पंप सुरू करून पाणी नदीत फेकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु साखळीत दिवसभर संततधार पावसाचा मारा सुरूच होता. पाऊस जर रात्रभर जोरदारपणे पडतच राहिला तर साखळीत पूरस्थिती उद्‍भवण्याची भीती आहे.

जलस्त्रोत खात्याची यंत्रणा सज्ज

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलस्रोत खात्याची पूरप्रतिबंधक यंत्रणा सज्ज झाली आहे. साखळी बाजारात साचणारे पाणी पंपिंग करून नदीत फेकण्याची प्रक्रिया सलगपणे हाती घेतली जाणार आहे. शक्यतो पुराचा धोका उद्‍भवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT