Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory फसवणूक प्रकरणी पुण्यातील संशयितास अटक, सांगे पोलिसांची कारवाई

ऊस तोडणी: 5.10 कोटी घेऊन केला होता पोबारा

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivani Sugar Factory संजीवनी साखर कारखान्याकडून 2017 साली ऊस तोडणीची टोळी आणण्यासाठी ५.१० कोटी रुपये आगाऊ रक्कम घेऊन कारखान्याची फसवणूक करणारा कंत्राटदार प्रदीप भगवान जमादार (पुणे - महाराष्ट्र) याला सांगे पोलिसांनी जेरबंद केले आहे.

प्रदीप जमादार याला सांगे न्यायालयात उभे केले असता पुढील चौकशीसाठी त्याची रवानगी कोलवाळ तुरुंगात केली आहे. कारखान्याच्या नियमांनुसार ऊस तोडणी करण्यासाठी आगाऊ रक्कम दिली जात होती, पण एकाच वेळी इतकी मोठी रक्कम कुणाच्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आली याचाही उलगडा होणे आवश्यक असल्याचे शेतकरी बोलू लागले आहेत.

वास्तविक राज्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडणी करण्यासाठी आगाऊ रक्कम मागितली, तर हमीदार द्यावा लागत असे आणि परराज्यातील कंत्राटदाराला इतकी मोठी रक्कम देण्यामागे कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय रक्कम मंजूर होणे शक्य नसल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांत सुरू आहे.

मजूर कंत्राटदार प्रदीप जमादार हे रक्कम हाती पडताच गायब झाले होते. कारखाना प्रशासक त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत होते.

मात्र, एक दोन वर्षांनंतर हा विषय सर्वजण विसरून गेले, पण सांगे पोलिस स्थानकातून साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोकुळदास गावकर आणि हवालदार महेश परब यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पकडण्यासाठी थेट पुणे शहर गाठून प्रदीप जमादार यास ताब्यात घेतले.

शिफारसकर्त्याची होणार चौकशी

ऊस तोडणी करण्यासाठी लागणारे मजूर आणण्यासाठी ठरावीक कंत्राटदारांना आगाऊ रक्कम दिली जाते, पण त्या रक्कमेला कोणी तरी हमीदार व शिफारस करणारा हवा असतो. प्रदीप जमादार यास इतकी मोठी रक्कम कोणाच्या शिफारशीवरून देण्यात आली याची चौकशी आता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT