सांगे: वाडे-कुर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील धनगरवाडा येथे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
सविस्तर माहिती अशी, की धनगरवाडा येथील भारती जानू झोरे (वय ३० वर्षे) हिने राहत्या घरीच गळफास घेऊन मृत्युला कवटाळले. मात्र, पत्नीच्या आत्महत्येनंतर अस्वस्थ झालेला पती जानू चिमणो झोरे (वय ३५ वर्षे) यानेही गुरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच अवस्थेत त्याला प्रथम सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर त्याला मडगाव जिल्हा इस्पितळात भरती केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्याला गोमेकॉत हलविले. या घटनेची माहिती समजताच समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी तातडीने मडगाव जिल्हा इस्पितळामध्ये धाव घेऊन विचारपूस केली.
या घटनेचा पंचनामा पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बोरकर यांनी केला. या दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप उघड होऊ शकलेले नाही. मात्र, या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याचे सांगण्यात आले. या कारणावरून कदाचित त्यांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भारती झोरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठविला आहे.
...अन् ग्रामस्थ हादरले : पती-पत्नीने टोकाचा निर्णय घेण्यासारखे नेमके काय घडले, हे अन्य कोणालाच माहिती नाही. पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे दिसताच पतीने गोठ्यात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कळताच वाड्यावरील ग्रामस्थांनी तातडीने जानू झोरे यांना गंभीर अवस्थेत खाली उतरवून उपचारासाठी नेले. या घटनेमुळे सांगे तालुक्यात खळबळ उडाली आहे.या दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप उघड होऊ शकलेले नाही. मात्र, या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याचे सांगण्यात आले. या कारणावरून कदाचित त्यांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भारती झोरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठविला आहे.
...अन् ग्रामस्थ हादरले : पती-पत्नीने टोकाचा निर्णय घेण्यासारखे नेमके काय घडले, हे अन्य कोणालाच माहिती नाही. पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे दिसताच पतीने गोठ्यात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कळताच वाड्यावरील ग्रामस्थांनी तातडीने जानू झोरे यांना गंभीर अवस्थेत खाली उतरवून उपचारासाठी नेले. या घटनेमुळे सांगे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.