Goa Police Dainik Gomantak
गोवा

Samagra Shiksha Scam: समग्र शिक्षा घोटाळ्याप्रकरणी पर्वरी पोलिसांची मोठी कारवाई! पश्चिम बंगाल आणि दिल्लीतून आणखी तिघे अटकेत

Goa Financial Fraud Education Scheme: समग्र शिक्षण अभियानातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी पश्चिम बंगाल आणि नवी दिल्ली येथून तीन आरोपींना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली.

Manish Jadhav

पणजी: समग्र शिक्षण अभियानातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी पश्चिम बंगाल आणि नवी दिल्ली येथून तीन आरोपींना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली.

दरम्यान, या प्रकरणी पर्वरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक (पीआय) राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथे रवाना करण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक माहिती, बँक खात्यांचे विश्लेषण आणि गुप्तचर यंत्रणेच्या साहाय्याने आरोपींचा माग काढण्यात आला. पहिल्या पथकाने पश्चिम बंगालच्या (West Bengal) करीमपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून सुमंता मोंडल (वय 40, रा. नाजीरपूर, नादिया) या आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला तेहट्टा येथील न्यायालयात हजर करुन ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले.

सुमंता मोंडलची चौकशी केल्यानंतर हे निष्पन्न झाले की, उर्वरित दोन आरोपी नवी दिल्ली येथे पलायन करुन गेले होते. पोलिसांनी तात्काळ दुसऱ्या पथकास दिल्लीकडे धाडले आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीने पहाडगंज परिसरात सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.

दिल्लीमध्ये (Delhi) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अलामिन मोंडल (वय 35, पुत्र अब्दुल मजीद मोंडल, रा. राउतारी, तेंटुल बारिया, नादिया, पश्चिम बंगाल) आणि विद्याधर मल्लिक (वय 52, पुत्र माधवानंद मल्लिक, रा. राउतारी, तेंटुल बारिया, नादिया, पश्चिम बंगाल) अशी आहेत. पोलिसांनी पर्वरी न्यायालयात त्यांना हजर करुन 6 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करुन घेतली.

तपास अजूनही सुरुच...

दरम्यान, या प्रकरणात एकूणच मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले असून त्यामध्ये इतरही आरोपी संलग्न असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rates: गोव्‍यातील कॅसिनो उद्योगासाठी धक्‍का! जीएसटी 40 टक्‍के; पर्यटन, इतर व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता

Usgao Theft: दार तोडले, महिलेच्या तोंडात कोंबला बोळा! पालवाडा-उसगावात चोरांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

Rashi Bhavishya 04 September 2025: खर्च वाढू शकतो, विद्यार्थ्यांना यशाची संधी; कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

SCROLL FOR NEXT