Goa Culture | Goa News Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोव्यात मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा सुरु; प्रमोद सावंतांचं ज्येष्ठांना गिफ्ट

CM Pramod Sawant: प्रमोद सावंत : ‘मुख्यमंत्री देवदर्शन’ यात्रा सुरू; भाविक तिरुपतीला

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: ‘मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा’ योजनेअंतर्गत आज तिरुपतीला भाविक रवाना झाले. समाजकल्याण संचालनालयातर्फे आयोजित या रेल्वेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. या खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई असल्याने या योजनेचा मान त्‍यांच्‍या सांगे मतदारसंघातील लोकांना सर्वप्रथम प्राप्त झाला.

पहिल्या टप्प्यात एक हजार भाविकांना संधी प्राप्त झाली आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी सरकार प्रत्येक भाविकावर 10,500 रुपये खर्च करणार असून हा दौरा आयआरसीटीसीतर्फे आयोजित केला आहे.

योजना शुभारंभ कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा, सांताक्रुझचे आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस, जिल्हा पंचायत दक्षिण गोवा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, समाजकल्‍याण खात्याच्या संचालक संध्या कामत व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. अन्‍य मान्‍यवरांनीही विचार व्यक्त केले. आयआरसीटीसीचे अधिकारी राजीव जैन यानी यात्रेसंदर्भात माहिती दिली. या दौऱ्यासाठी खास चार्टर ट्रेनची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले.

राज्‍यातील प्रत्येक वडीलधाऱ्या माणसाला सरकारमार्फत देवदर्शनाची संधी दिली जाईल. त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठीच ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. यात कसलेही राजकीय हित नाही. पहिल्या टप्प्यात तिरुपती व नंतर 20 नोव्हेंबरपासून वालंकिणी, शिर्डी येथे यात्रा आयोजित केली जाईल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT