Vegetables Rate Dainik Gomantak
गोवा

Vegetables Rate: भाजीपाल्याच्या दराने गोवेकरांच्या खिशाला कात्री; तर टोमॅटोच्या दराने काहीसा दिलासा

Vegetables Rate: गोवा राज्यातील ग्रामीण भागातील मुळे, भेंडी, गवार बाजारात दाखल झाली आहेत.

दैनिक गोमन्तक

Vegetables Rate: गोवा राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लागवड केलेली लालभाजी, मुळे, काही प्रमाणात भेंडी, गवार बाजारात दाखल झाली असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात या भाज्या खरेदीकडे कल आहे. कारण या ताज्या भाज्या मिळतात तसेच दरदेखील इतर भाज्यांच्या तुलनेत समान आहेत.

राज्यात कांदे, बटाटे तसेच इतर भाजीपालादेखील अजून महागच आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. टोमॅटो 50 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. आता 30 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. मिरची अजूनही तिखटच आहे. कारण गेल्या वर्षी 40 ते 50 रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या हिरव्या मिरचीने यंदा शंभरी गाठली आहे. 40 रुपये जुडी मिळणाऱ्या कोथिंबिरीचे भावदेखील 10 रुपयांनी उतरले आहेत.

कंदमुळे, फळांना अधिक मागणी

राज्यात आता व्रतवैकल्याचे दिवस सुरू असल्याने चिनी, कणगी, करांदे, तसेच इतर कंदमुळे व फळांनादेखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केळी 60 ते 80 रुपये प्रतिडझन दराने विकले जात असून सफरचंद, डाळिंब, चिकू, मोसंबी, द्राक्ष यांचे दरदेखील वाढले आहेत.

दर प्रतिकिलो (रुपयांत)

  • कांदा....40

  • बटाटा....40

  • टोमॅटो....30

  • गवार....60

  • कोबी....40

  • फ्लॉवर....40

  • गाजर....60-80

  • भेंडी....70-80

  • शिमला मिरची... 80-

  • हिरवी मिरची....100

पालेभाजी प्रतिजुडी (रुपयांत)

  • मेथी....20

  • लालभाजी....20

  • कांदापात....20

  • मुळा....20

  • पालक....20

  • शेपू....10

  • पुदिना....10

  • कोथिंबीर....30 रु. एक जुडी

  • लिंबू ....5 रुपयांना 1

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT