CM Pramod Sawant X Social Media
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: माफीवर सत्ताधारी ठाम, 15 मिनिटांच्या गदारोळानंतर दुसऱ्या दिवशीही कामकाज तहकूब

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: एल्टन डिकॉस्ता यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत कामकाज पुढे जाणार नाही - मुख्यमंत्री

Pramod Yadav

सभापतींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी भाजप दुसऱ्या दिवशीही एल्टन डिकॉस्ता यांच्या माफीच्या मागणीवर ठाम राहिले. तब्बल पंधरा मिनिटे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आणि गोंधळानंतर कामकाज बारावाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एल्टन डिकॉस्ता यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत कामकाज पुढे जाणार नाही, अशी भूमिका घेतली. एल्टन डिकॉस्ता यांनी सभापतींबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागण केली.

एल्टन यांनी कारवाईला सामोरे जाण्याची सकारात्मकता दर्शवली खरी पण सर्व प्रकरण हक्कभंग समितीसमोर मांडण्याची विनंती केली. समिती जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल, असे डिकॉस्ता यांनी सभागृहात सांगितले. पण, प्रस्ताव चर्चेसाठी आला नाही डिकॉस्ता यांनी सभागृहाच्या बाहेर हे वक्तव्य केल्याने त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली. अखेर गोंधळ वाढल्याने सभापतींनी पंधरा मिनटानंतर कामकाज तहकूब केले.

बारावाजता कामकाज सुरु झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत माफीची मागणी केली. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मध्यस्थी करत एल्टन यांनी सभापतींची नव्हे तर त्या पदाची माफी मागावी अशी विनंती केली.

मात्र, एल्टन देखील त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत समितीसमोर प्रकरण मांडण्याची मागणी त्यांनी केली. समिती जो काही निर्णय देईल तो मान्य असेल, असे त्यांनी सांगितले. यालाच आमदार विजय सरदेसाई, युरी आलेमाव आणि वेंझी व्हिएगस यांनी देखील यालाच समर्थन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT