Babush Monserrate, Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

Babush Monserrate Utpal Parrikar: राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघातर्फे रविवारी आझाद मैदानावर आयोजित विजयादशमी उत्‍सवाला पणजीचे आमदार बाबूश मोन्‍सेरात उपस्‍थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघातर्फे रविवारी आझाद मैदानावर आयोजित विजयादशमी उत्‍सवाला पणजीचे आमदार बाबूश मोन्‍सेरात उपस्‍थित होते. दोन तास बसून त्‍यांनी कार्यक्रमाचे अवलोकन केले. निसर्ग जपा, असा संदेश यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक अर्जुन (बाबा) यशवंत चांदेकर यांनी दिला.

‘विजयादशमी कार्यक्रमातून आपल्‍याला भरपूर काही शिकायला मिळाले. संघाकडून कायमच समाजहिताचे काम सुरू असून, बालपणापासून आपण ते पाहत आलो आहे’, असेही त्‍यांनी नमूद केले. गत विधानसभा निवडणूक पणजीतून भाजपच्‍या उमेदवारीवर लढून ती जिंकलेले आणि मंत्रिपद मिळवलेले बाबूश मोन्‍सेरात भाजपच्‍या पणजीतील बहुतांशी कार्यक्रमांना न चुकता उपस्‍थित राहतात.

रविवारीही ते संघाच्‍या कार्यक्रमाला आवर्जून उपस्‍थित राहिले. पत्रकारांशी संवाद साधताना त्‍यांनी, आमंत्रणाबद्दल संघाच्‍या पणजी शाखेचे आभार मानले. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी अभिनंदन करतो.

माझ्यावर रा. स्व. संघाचे संस्कार

राजकीयदृष्‍ट्या बाबूश यांचे विरोधक असलेले माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीही आज संघाच्‍या गणवेशात कार्यक्रमाला उपस्‍थिती लावली होती. लहानपणापासूनच माझ्यावर संघाचे संस्कार झाले असून, त्‍याचा मला गर्व आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने संघात यावे आणि संघ विचार आत्मसात करावेत, असे आवाहनही उत्‍पल पर्रीकर यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

SCROLL FOR NEXT