Rohan Khaunte |Goa News Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte Statement on IIT: नवे आयटी उद्योग राज्यासाठी वरदान ; राज्याच्या आयटी क्षेत्राला एक नवी गती मिळेल

Rohan Khaunte: नवी दिल्लीत घेतली केंद्रीय मंत्र्यांची सदिच्छा भेट

दैनिक गोमन्तक

Rohan Khaunte on IIT: गोव्याचे पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांची भेट घेतली. उभयतांमध्ये गोव्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाबाबत चर्चा झाली.

खंवटे यांनी केंद्रीय मंत्री वैष्णव यांना राज्य सरकारने हाती घेतलेल्या आयटी प्रकल्पांची माहिती दिली. नवीन उपक्रमांद्वारे आयटी क्षेत्राला चालना देण्याबाबतच्या सरकारच्या उपाययोजनांची देखील कल्पना खंवटे यांनी त्यांना करून दिली.

केंद्रीय मंत्री वैष्णव आणि खंवटे यांनी राज्याच्या आयटी क्षेत्रातील रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधींबाबतही सविस्तर चर्चा केली. नवीन आयटी उद्योग राज्यासाठी वरदान ठरणार असून राज्याच्या आयटी क्षेत्राला त्यामुळे एक नवी गती मिळेल, असे खंवटे यांनी वैष्णव यांना सांगितले. त्याद्वारे तरुणांसाठीही नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

दोन्ही मंत्र्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध योजना आणि प्रकल्पांवर चर्चा केली. केंद्रीय मंत्र्यांनी हॅशटॅग वर्केशन गोवा या राज्य सरकारच्या संकल्पनेची माहिती करून घेतली. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर गोव्यातील तीन किनाऱ्यांवर राबविण्यात आला.

कनेक्टिव्हिटी समस्या सुधारणार

गोवा हे पसंतीचे आयटी केंद्र बनविण्यासाठी आयटी आणि संबंधित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढविण्याच्या आमच्या उपक्रमांना केंद्रीय मंत्र्यांनी सतत समर्थन दिले आहे. त्यांच्या पाठिंब्याने आगामी काळात राज्य सरकार गोव्याच्या ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी समस्या सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही मंत्री रोहन खंवटे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT