Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: गोव्यात अपघातांची मालिका सुरूच; शनिवारी दोन घटनांत दोघे गंभीर

Goa Road Accident: गोव्यात होणारे बरेचसे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यानेच होत असल्याचे समोर आले आहे.

Ganeshprasad Gogate

Goa Road Accident: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच आज शनिवारी 20 जानेवारी रोजी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एका अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना GMC मध्ये दाखल करण्यात आले आहे तर दुसरा अपघात हा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे समजतेय.

शनिवारी पेडणे नजीक धारगळ येथील आयुष्य हॉस्पिटलनजीक कार आणि बाईक यांच्या भीषण अपघात झाल्याचे वृत्त हाती येत असून हा अपघात दुपारी 2 च्या सुमारास झालाय.

या अपघातात बाईक रायडर आणि कार चालक दोन्ही गंभीररीत्या जखमी झाले असून दोघानांही बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

तर दुसरा अपघात हा हणजूण येथे झाला असून ही रेंट अ कार असून कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे समजतेय भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार चालकाची धडक सेंट ऍन्थोनी चॅपेलच्या कंपाउंडला बसली.

ही धडक एवढी जबरदस्त होती की, यात कंपाउंडच्या संरक्षक भिंतीचा काही भाग मोडून पडला. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT