Goa road rage incident Dainik Gomantak
गोवा

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Goa road rage incident: बेशिस्तपणे ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दुचाकीस्वाराला अन्य एका दुचाकीस्वाराकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: बेशिस्तपणे ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दुचाकीस्वाराला अन्य एका दुचाकीस्वाराकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अस्नोडा बसस्थानकाजवळ घडली असून, मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. याप्रकरणी रत्नाकर देविदास यांनी बुधवारी कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मारहाण करणाऱ्या संशयित सागर उसपकर याला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले आहे.

मारहाणीची ही घटना गेल्या सोमवारी (ता. २७) अस्नोडा बसस्थानकाजवळ घडली होती. मात्र वैद्यकीय उपचारासाठी दोन दिवस गेल्यामुळे बुधवारी तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. तक्रारदार रत्नाकर देविदास यांनी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सादर केले आहे.

रत्नाकर देविदास हा आपल्या मोटारसायकलवरून अस्नोड्याहून शिरगाव येथे मामाच्या घरी जात होता. अस्नोडा बसस्थानकाजवळ पोहोचताच मागाहून मोटारसायकलवरून येणाऱ्या सागर उसपकर याने रत्नाकरच्या दुचाकीला ओव्हरटेक केले. यावेळी अपघात (Accident) होता होता टळला. यावरून रत्नाकर याने सागरला जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन सागरने रत्नाकरवर हल्ला केला. यात रत्नाकरच्या तोंडाला आणि डोक्याला मुका मार बसला. त्याला तातडीने डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT