Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; दुचाकीस्‍वार युवतीचा दुर्दैवी अंत

Goa Road Accident: कासारवर्णेतील दुर्घटना : दुसरा दुचाकीचालकही गंभीर

Ganeshprasad Gogate

Goa Road Accident: पेडणे तालुक्‍यातील कासारवर्णे येथे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात सुजाता सुरेश सातार्डेकर (25 रा. कळणे-दोडामार्ग) या युवतीचा जागीच मृत्यू झाला.

तर, दुसऱ्या दुचाकीवरील फायझर फ्रान्सिस मास्कारेन्हस (25 रा. हसापूर) हा महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाला.

उपचारांसाठी त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला गोमेकॉत हलविण्यात आले.

मिळालेल्‍या माहितीनुसार, सुजाता सातार्डेकर ही युवती मोपा विमानतळावर नोकरीला होती. रात्रपाळी संपल्यावर सकाळी ती आपल्या दुचाकीने (एमएच-०७-एटी-११५०) कळणे-दोडामार्ग येथे घरी जात होती. त्याचवेळी काळाने तिच्यावर झडप घातली.

मोपाचे पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक हळदणकर आणि साहाय्यक उपनिरीक्षक मधुकर मळीक यांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

हेल्‍मेटचे झाले तुकडे:-

सुजाता कासारवर्णे येथे पोहोचल्यावर दुचाकीपुढे असलेल्या एका कारला ओव्हरटेक करण्‍याचा तिचा अंदाज चुकला आणि समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीला तिची जोरात धडक बसली.

हा अपघात एवढा भीषण होता की, सुजाताच्‍या हेल्मेटचे तुकडे-तुकडे झाले. परिणामी तिच्‍या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्युमुखी पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT