Goa Road Accident: शनिवारी गोव्यात रस्ते अपघाताच्या दोन घटना घडल्या असून दोन्ही घटना उत्तर गोव्यात झाल्याची नोंद प्राप्त झाली आहे. वाढते अपघात रोखण्याचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले असून बहुतांशी अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यानेच होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.
कोलवाळ येथून एक हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आले. थिवी करासवाडा महामार्गावर इनोव्हा कारने (जीए 03 के 6004) ॲक्टिव्हा स्कूटरला (जीए 07 8177) धडक दिली असून इनोव्हा कार चालक अपघातानंतर जखमींना घटनास्थळीच सोडून पळून गेलाय.
कळंगुट- नाईक वाडो येथील आनंद गाडेकर असे टॅक्सी चालकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ॲक्टिव्हा स्कूटरवर असलेले सुनील कुमार सहानी आणि सुधीर कुमार सहानी हे मूळचे बिहारचे असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
कोलवाळ पोलिस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरु आहे. जखमींना सध्या म्हापसा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
शनिवारी सकाळी गवाणे सत्तरी येथे मोपेड स्कूटर आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात घडला असून स्थानिक सदा घोलकर ही व्यक्ती किरकोळ तर परप्रांतीय कामगार जबर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.