Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: अपघात नियंत्रणासाठी पुढील दोन महिन्‍यांत उपाययोजना करणार

CM Pramod Sawant: ‘बांधकाम खात्‍याने आवश्‍‍यक जागी गतिरोधक उभारण्‍याचे काम हाती घेतले आहे’- सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant: राज्‍यातील वाढते अपघातबळी हा चिंतेचा विषय ठरला असून त्‍या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महत्त्‍वाचे विधान केले आहे. ‘अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस व वाहतूक खात्याने काही उपाय सुचवले आहेत.

त्‍याची प्रत्‍यक्षात अंमलबजावणी व उपयुक्‍तता दिसण्‍यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्‍या संदर्भात नुकतीच बैठक झाली असून, त्‍यात कृती आराखडा ठरला आहे’, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

राजधानी पणजीत कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नवीन इमारतीची आज पायाभरणी झाली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍‍नांवर ते बोलत होते. ‘बांधकाम खात्‍याने आवश्‍‍यक जागी गतिरोधक उभारण्‍याचे काम हाती घेतले आहे’, असेही सावंत म्‍हणाले. राज्‍यात वर्षभरात 270हून अधिक अपघातबळी झाले असून, दरदिवशी लहान-मोठे अपघात होत आहेत.

सध्या पर्यटन हंगाम सुरु झाला असून देशविदेशातील पर्यटक गोव्यात येत आहेत. सर्वसाधारण निरीक्षणानुसार दरवर्षी याच कालावधीत रस्ते अपघातांचे प्रमाण जास्त असते. यामध्ये वाहतूक सिग्नलचे पालन न करणे, भरधाव वेगात गाडी चालवणे, रस्त्यांचा अंदाज न येणे अशा अनेक कारणास्तव अपघात होत असतात. याच कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी महत्वाची माहिती दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT