Canacona Road Accident Dainik Gomantak
गोवा

Canacona Road Accident: काणकोण- माशे येथे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू

Canacona Road Accident: रस्त्यावर माशांच्या गाडीतील सांडलेल्या पाण्यावर दुचाकी घसरल्याने अपघात झाला.

Ganeshprasad Gogate

Canacona Road Accident: राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असून वाहन चालकांचा वाहनांवरील ताबा सुटणे, अपघात प्रवण क्षेत्रे तसेच धोकादायक वळणांवर सुरक्षा कठडे नसणे आणि रस्ते अपघात रोखण्यात प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष हीच करणे समोर येत आहेत. काणकोण माशे येथे रविवारी सकाळच्या सुमारास एक अपघात झाल्याची माहिती हाती येतेय.

माशे काणकोण येथे एका दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दिया दिगंबर नाईक नामक 20 वर्षांची युवती जागीच मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

या अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार दिया नाईक आणि रोहन पाटील (दोघेही मूळ रा. कर्नाटक) वेर्णाहून कर्नाटकला जात होती.

यावेळी सदर दुचाकी घटनास्थळी पोहोचताच तोल जाऊन घसरली आणि दुचाकीवरील दिया नाईक ही रस्त्यानजीकच्या विजेच्या खांबाला जाऊन आदळली.

दिल्याचे डोके खांबाला धडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर रोहन पाटील हा जखमी झालाय. या रस्त्यांवरून नेहमी मासे वाहतूक करणाऱ्या गाड्या जात असून हा चढणीचा रस्ता असल्याने गाड्यांमधील पाणी रस्त्यावर पसरत असते.

या आधीही या सांडलेल्या पाण्यावरून गाड्या घसरून अपघात झाले होते. यावेळीही दिया नाईक आणि रोहन पाटील यांची KTM बाईक याच पाण्यावरून घसरल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून राज्यातील वाढत्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT