River Pollution Dainik Gomantak
गोवा

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Goa River Pollution: राज्यातील नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या ऑगस्ट २०२६ मधील तपासणीत अनेक ठिकाणी फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या ऑगस्ट २०२६ मधील तपासणीत अनेक ठिकाणी फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात ही माहिती दिली आहे.

मंडळाच्या वर्गीकरणानुसार तपासलेल्या नदीस्थळांपैकी शापोरा नदीवरील शिवोली पूल, तेरेखोल नदीवरील केरी, मांडवी नदीवरील टोंक-माशेल, साळ नदीवरील खारेबांद व मोबोर तसेच झुआरी नदीवरील मडगाव जेटी व बोरी पूल येथे फिकल कोलिफॉर्म निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळले.

शापोरा नदीवरील शिवोली पुलाजवळ फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण ७८० एमपीएन/१०० मिली असून, निर्धारित मर्यादा १०० आहे. तेरेखोल नदीवरील केरी येथे हे प्रमाण ९३० आहे. मांडवीच्या टोंक- माशेल येथे ७८०, सिकेरी, कांदोळीत अनुक्रमे ९२० व ७८० अशी नोंद आहे. झुआरी नदीच्या मडगाव जेटी येथे फिकल कोलिफॉर्म ६८०, तर बोरी पुलाजवळ ४५० आढळले.

साळ नदीवरील खारेबांद येथे ७८० आणि मोबोर येथे ४५० अशी नोंद झाली. मात्र, शापोरा नदीवरील हळर्ण किल्ला, डिचोली, अस्नोडा, वाळवंटी, खांडेपार, तळपण आणि कळणे नदीवरील चांदेल आदी ठिकाणी तपासलेले मापदंड निर्धारित मर्यादेत असल्याचे अहवालात नमूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sindhudurg Crime News: अंगावर जखमांच्या खुणा, अर्धनग्न अवस्था अन् गोधडीत गुंडाळलेला मृतदेह; तिलारी कालव्यात सापडलेल्या मृतदेहाने खळबळ, घातपाताचा संशय

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

SCROLL FOR NEXT