Heavy rain in goa Dainik Gomantak
गोवा

पर्जन्‍यराजा कोपला! पावसाच्या कहरामुळे शेतकरी अस्वस्थ; भाताची कणसे आडवी, कापणी यंत्र नसल्याने वाढल्या समस्या

Goa Rice Farming: गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्‍या पावसामुळे मयेसह डिचोलीतील विविध भागात कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्‍या पावसामुळे मयेसह डिचोलीतील विविध भागात कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेती आडवी झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असाच पाऊस पडत राहिल्‍यास यंदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्‍याची भीती व्‍यक्त केली जात आहे.

एका बाजूने पावसाचा धुमाकूळ तर दुसऱ्या बाजूने कापणी यंत्राची अनुपलब्धता यामुळे तयार झालेले भात पीक कापण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. परिणामी यंदा भातशेती संकटात सापडली आहे.

पावसाच्या कहरामुळे बळीराजा अस्वस्थ बनला असून, कपाळावर हात मारण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. यंदा भात पीक समाधानकारक मिळण्याची आशा निर्माण झाली असतानाच पर्जन्‍यराजा कोपलाय, तर दुसऱ्या बाजूने वेळेवर कापणी यंत्र उपलब्ध करून देण्यास कृषी खाते अपयशी ठरले आहे, अशी शेतकऱ्यांची कैफियत आहे.

कापणी यंत्र अनुपलब्ध

पावसाचा कहर सुरू होण्यापूर्वीच भातशेती पिकून कापणीसाठी तयार झाली होती. मात्र कापणी यंत्र उपलब्ध करून देण्यात कृषी खात्याला अपयश आले. सदर यंत्र त्वरित उपलब्ध करून द्या, अशी मागणी मयेतील शेतकऱ्यांनी करून गेल्या मंगळवारी डिचोलीच्या विभागीय कृषी कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र अजूनही यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, अशी खंत मये येथील महादेव नाईक, नागेश नाईक आणि इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाचा तडाखा असाच कायम राहिल्यास यंदा भातपिकाची नासाडी अटळ असल्‍याची भीतीही त्‍यांनी व्यक्त केली आहे.

सलग पाच दिवस पर्जन्यवृष्टी

मयेसह बोर्डे, पिळगाव आदी डिचोलीतील बहुतांश भागात भातशेती पूर्णपणे पिकून शेतकरी कापणीच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून आज गुरुवारपर्यंत सलग पाच दिवस पर्जन्यवृष्टी झाली आहे. या तडाख्यात डिचोलीतील विविध भागातील भातशेतीत पाणी साचले असून, काही ठिकाणी भाताची कणसे आडवी झाली आहेत. बळीराजाने कापणीच्या कामाला हात घालण्याची तयारी केली होती. मात्र पावसाने कहर केल्याने शेतीत पाणी साचून भाताची कणसे आडवी झाल्याने कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT