Babush Monserrate on Smart city work  Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: कन्सल्टंटला 8 कोटी रूपये दिले; स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जाची जबाबदारी त्यांचीच

पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामाबाबत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे मत

Akshay Nirmale

Babush Monserrate on Panaji Smart city work: गोव्याची राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांसाठी नेमलेल्या कन्सल्टंटला ८ कोटी रूपये दिले आहेत. आता या कामाच्या दर्जावर लक्ष, देखरेख ठेवण्याची जबाबदारी कन्सल्टन्सीची आहे, असे स्पष्ट मत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केले.

मंत्री मोन्सेरात म्हणाले की, एका कन्सल्टंटला 8 कोटी रूपये दिले. कन्सल्टन्सीद्वारे या कामांवर निरीक्षण केले जात आहे. कन्सल्टन्सी नेमल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे लक्ष देत नाही. ते कन्सल्टन्सीकडे बोट दाखवतात. कन्सल्टन्सी आहे म्हणून सांगितले जाते.

मी कन्सल्टन्सीला दोष देत नाही. जमिनीखाली नेमकी काय परिस्थिती आहे, हे त्या कन्सल्टंटला तरी कळाले पाहिजे. जमिनीखाली काय आहे, कुणाला माहिती आहे? कन्सल्टन्सी अपयशी ठरली आहे, असे मी म्हणत नाही.

मोन्सेरात म्हणाले की, सरस्वती मंदिर येथील काम चांगल्या दर्जाचे झालेले नाही, असे मला वाटते. माझे म्हणणे खोटे ठरावे, अशी आशा मी बाळगतो. पण, जेव्हा कोट्यवधी रूपये कन्सल्टंटला दिले जातात, तेव्हा कामाच्या दर्जावर लक्ष ठेवणे ही कन्सल्टंटची जबाबदारी आहे.

मला कुणावर टीका करायची नाही. मी काही बोललो आणि त्यांनी काम बंद केले, तर त्याचे खापर माझ्यावर फोडायला लोक मोकळे होतील, त्यामुळे वेट अँड वॉच अशीच माझी भूमिका आहे.

या कामाला मी 'स्मार्ट मेस्स' म्हणणार नाही, मॉन्सूनला सुरवात झाल्यावर सर्व काही समोर येईल.

दरम्यान, मंगळवारी रात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली होती. त्या विषयी विचारले असता, मोन्सेरात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले आहे ते चांगले आहे.

पण स्मार्ट सिटीच्या कामात काही वाईट असेल तर मुख्यमंत्री त्याला जबाबदार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT