Goa Transport Rules Dainik Gomantak
गोवा

Goa Transport Rules: रेंट-ए-कॅबमधील थार वाहनांवर निर्बंध लागू; 15 जुलैपासून एआय कॅमेऱ्यांद्वारे होणार स्वयंचलित चलन

AI Traffic Cameras Goa: राज्यातील ‘रेंट-ए-कॅब’ व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या महिंद्रा ‘थार’ वाहनांवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील ‘रेंट-ए-कॅब’ व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या महिंद्रा ‘थार’ वाहनांवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी दिली.

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांना १५ जुलैपासून ‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे चलन जारी होणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह अटकेची कारवाई केली जाणार आहे.

एकाच दिवसात ५६,५०० हून अधिक नियमभंग

राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित वाहतूक कॅमेऱ्यांनी ४ जुलै रोजी २६ ठिकाणी तब्बल ५६,५०० हून अधिक वाहतूक नियम उल्लंघने नोंदविली. यामध्ये सीट बेल्ट न लावणे, वैध विम्याशिवाय वाहन चालवणे आणि इतर नियमभंगांचा समावेश होता. सध्या केवळ इशारापत्रे पाठविण्यात येत असून १५ जुलैपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT