Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात 1040 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 159 नव्या रूग्णांची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज दिवसभरात 159 नव्या कोरोना (Goa Corona Cases) बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 200 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आलाय. गोव्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली असून, सध्या राज्यात 1040 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील पाच दिवसांत गोव्यात एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 55 हजार 408 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 50 हजार 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.04 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,957 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 1,297 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

देशातील सक्रिय रूग्णांची संख्या एक लाखाच्या आत

देशात देखील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 10,649 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 36 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 96 हजार 442 रूग्ण उपचाराधीन आहेत. देशात सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दिल्ली, पंजाब या राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रूग्ण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT