Goa  Dainik gomantak
गोवा

Goa Corona Update: आजही एक कोरोना रूग्ण दगावला, नवीन 136 रूग्णांची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मागील तीन दिवसांपासून कोरोना रूग्ण दगावत आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांत तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 136 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 172 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 55 हजार 825 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 50 हजार 919 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोव्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के एवढा झाला आहे. सध्या गोव्यात 946 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत.

शनिवारी दिवसभरात गोव्यात 1,114 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले. आज एक रूग्ण नव्याने रूग्णालयात दाखल करण्यात आला तर, रूग्णालयात दखल असलेला एका रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, गणेशोत्सवाच्या तोंडावर गोव्यात कोरोना रूग्णांची संख्या काहीसी वाढताना दिसत आहे, तसेच मागील तीन दिवसांपासून रूग्ण देखील दगावत आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT