Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यातील कोरोना संसर्गाची स्थिती काय? जाणून घ्या ताजी आकडेवारी

गोव्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोना संबधित मृत्यूची नोंद झाली नाही.

Pramod Yadav

गोव्यात गुरूवारी (दि.24) दिवसभरात केवळ सात नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून, दहा कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोव्यात सलग तिसऱ्या दिवशी सात रूग्णांची नोंद झाली असून, तीन दिवसांत 21 रूग्णांची वाढ झाली आहे. यासह राज्यातील सक्रिय कोरोना बांधितांची संख्या देखील कमी झाली असून, सध्याच्या घडीला राज्यात 45 कोरोना बाधित रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत.

गोवा आरोग्य विभागाच्या (Goa Health Department) वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 59 हजार 003 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 54 हजार 945 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर राज्यात 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 427 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.43 टक्के एवढा झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे गोव्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोना संबधित मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि जनजागृती यामुळे कोरोना संसर्ग कमी झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT