Goa Rent A Cab Dainik Gomantak
गोवा

Goa Rent A Cab: 'रेन्ट-अ-कॅब'च्या मनमानीला लगाम; गोव्यात आता परवाने अन् वाहन तपासणीसाठी समान नियम

Goa Rent A Cab Business: गोव्यात वेगाने वाढत असलेल्या ‘रेन्ट-अ-कॅब’ व्यवसायाला अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक चौकटीत आणण्यासाठी वाहतूक खात्याने सविस्तर प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात वेगाने वाढत असलेल्या ‘रेन्ट-अ-कॅब’ व्यवसायाला अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक चौकटीत आणण्यासाठी वाहतूक खात्याने सविस्तर प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात केवळ १० परवानाधारकांच्या नावावर तब्बल साडेसहा हजारांहून अधिक कॅब कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

नव्या ‘एसओपी’मध्ये ‘रेन्ट-अ-कॅब’ परवाने, वाहन तपासणी, परवाना नूतनीकरण, वाहन बदल, हस्तांतरण, नवीन वाहनांची भर तसेच अनधिकृत व्यवसायावरील कारवाई यासाठी एकसमान नियम निश्चित केले जाणार आहेत. मोटार वाहन कायदा १९८८, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९, रेन्ट-अ-कॅब योजना १९८९ आणि गोवा मोटार वाहन नियम १९९१ यांच्या अधीन राहून ही कार्यपद्धती राबविली जाणार आहे. नव्या ‘एसओपी’मुळे राज्यातील टॅक्सी व्यवसायात शिस्त निर्माण होईल, अशी आशा आहे.

यापुढे व्यवसायासाठी स्वतंत्र कार्यालय अनिवार्य

व्यवसायासाठी स्वतंत्र कार्यालय अनिवार्य करण्यात येणार असून मुख्य कार्यालयासाठी किमान १०० चौरस मीटर, तर शाखा कार्यालयासाठी ५० चौरस मीटर जागा आवश्यक असेल. कार्यालयात स्वागत कक्ष, प्रशासकीय विभाग आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा असाव्यात.

सर्व ऑपरेटर आणि वाहनांची केंद्रीकृत नोंदणी करण्यात येणार असून प्रत्येक व्यवहाराची माहिती जतन करावी लागेल. परवाना निलंबन किंवा रद्द करण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया निश्चित केली जाणार असून अर्जदारांना प्रवासी वाहतूक व्यवसायाचे ज्ञान असल्याची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार चाचणीही घेतली जाऊ शकते.

नवीन परवान्यांवरील विद्यमान निर्बंध कायम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एसओपी’ लागू झाल्यानंतरही नवीन परवान्यांवरील विद्यमान निर्बंध कायम राहणार आहेत. राज्य वाहतूक प्राधिकरणाची विशेष परवानगी असल्याशिवाय नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मात्र, विद्यमान परवानाधारकांसाठी नूतनीकरण, वाहन बदल आणि हस्तांतरण यांसारख्या प्रक्रियांवर नियमित देखरेख ठेवली जाईल.v

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT