कोरोना (Covid-19) संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेपासून काहीकाळ सुरक्षित राहिलेल्या गोव्यात (Goa) सध्या मात्र कोरोना रुग्णांची संख्या (Covid 19 patients) वाढत जात असल्याचे पाहायला मिळते आहे. याच अनुशंघाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे. तरी सुद्धा गोव्यात हजारो कोरोना रुग्ण सापडत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आजसुद्धा गोव्यात 2491 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (Goa records 2000 new covid patient in last 24 hours.)
गोव्यात फोफावत चाललेल्या कोरोना संक्रमणावर आळा घालण्यासाठी गोव्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तरी देखील रुग्णवाढ थांबताना दिसत नाहीये. आज गोव्यात 2491 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर या नव्या रुग्णांसह राज्यात सध्या 32953 रुग्ण उपचार घेत आहेत. तर दुःखद गोष्ट ही आहे की गोव्यात 24 तासांत 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृत्यूचा आकडा 1937 वर पोहोचला आहे.
कोरोनाचे हे संकट वाढत जात असताना सकारात्मक बाब अशी आहे की, मागच्या 24 तासांत 2266 रुग्ण बरे होऊन घरी परतेल आहेत. यासह आता पर्यंत गोव्यातील 95240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तरी येणाऱ्या काळात रुग्णवाढ होऊ नये यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.