Goa Unemployment  Dainik Gomantak
गोवा

बेरोजगारीत 'गोवा' देशात 'टॉप टेन'मध्ये; राज्यात बेरोजगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त

सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी (CMIE) देशातील विविध राज्यांचा बेरोजगारी दर जाहीर केला आहे.

Pramod Yadav

Goa Unemployment Rate: गोव्यातील बेरोजगारीचा दर वाढला असल्याचे चिन्ह आहे. राज्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी (CMIE) देशातील विविध राज्यांचा बेरोजगारी दर जाहीर केला आहे. अहवालात 27 राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत गोवा 'टॉप टेन'मध्ये आहे.

(Goa Top's in Unemployment Rate In India)

CMIE च्या अहवालानुसार, गोव्यात (Goa) बेरोजगारीचा दर 11.1 टक्के आहे. देशातील 27 राज्यांच्या यादीत गोवा नवव्या क्रमांकावर आहे. एवढेच नव्हे तर राज्याचा बेरोजगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. देशातील शहरी बेरोजगारी दर 8 टक्के आहे तर, ग्रामीण भागातील बेरोजगारी दर 7.4 टक्के आहे.

याशिवाय, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये गोव्यापेक्षा बेरोजगारीचा दर गोव्यापेक्षा अधिक आहे. तसेच, गोवा शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात देखील बेरोजगारी दर गोवापेक्षा कमी आहे. जानेवारी 2023 च्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये सुधारणा झाल्याचे CMIE च्या अहवालात म्हटले आहे.

कोणत्या राज्यात किती बेरोजगारीचा दर ?

हरियाणा 29.4, राजस्थान 28.3, सिक्किम 21, झारखंड 16.8, हिमाचल प्रदेश 13.9, त्रिपुरा 11.7, बिहार 12.3, दिल्ली 8.6, आसाम 8.6, तेलंगणा 5.8, पंजाब 8.2, केरळ 5.6, महाराष्ट्र 5.6 असे राज्यातील बेरोजगारी दर आहेत.

दरम्यान, राज्यात विविध विकासकामे होत असताना बेरोजगारीचा वाढता दर चिंताजनक आहे. विरोधकांनी राज्यातील बेरोजगारी बाबत सरकारावर वारंवार टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT