goa  Dainik Gomantak
गोवा

PAI: सार्वजनिक व्यवहार निर्देशांकात गोवा चौथा

राजकीय न्याय निर्देशांकात गोवा शेवटच्या क्रमांकावर

दैनिक गोमन्तक

सार्वजनिक व्यवहार निर्देशांक (PAI) 2022 क्रमवारीत 10 लहान राज्यांमध्ये गोव्याला चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. सार्वजनिक व्यवहार निर्देशांक 2022 आज सार्वजनिक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केला असुन त्यानुसार ही स्थान निश्चिती करण्यात आली आहे.

(Goa ranks fourth among 10 small states in Public Affairs Index 2022)

मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक व्यवहार (PAI ) 2022 निर्देशांकाने आर्थिक न्याय, राजकीय न्याय आणि सामाजिक न्याय या तीन मानकांच्या अंतर्गत सर्व राज्यांचे मूल्यांकन केले गेले आहे. त्यानुसार राज्यांना क्रमांक बहाल करण्यात आले आहेत. छोट्या राज्यांमध्ये सिक्कीम अव्वल तर हरियाणा मोठ्या राज्यांमध्ये अव्वल आहे. राजकीय न्यायाच्या बाबतीत गोव्याने सर्वात खराब कामगिरी असल्याने 10 राज्यांमध्ये सर्वात शेवटी गोव्याला स्थान मिळाले आहे.

राज्यांच्या राजकीय न्याय निर्देशांकाची क्रमवारी फौजदारी न्याय व्यवस्थेच्या कार्यक्षम कारभारावर आणि लोकशाही संघराज्य रचनेवर आधारित होती. आर्थिक न्याय निर्देशांकात गोवा तिसऱ्या तर सामाजिक न्याय निर्देशांकात राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. बेंगळुरू स्थित पब्लिक अफेयर्स सेंटर (PAC) द्वारे भारतातील राज्यांमधील प्रशासनावर नफा नसलेल्या थिंक टँकने सातवी आवृत्ती आज प्रसिद्ध केली असुन त्यानुसार राज्यांची स्थान निश्चिती करण्यात आली आहे.

'या' मानकांद्वारे केली स्थान निश्चिती

10 लहान राज्यांमध्ये सिक्कीमने 0.5715 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. गोवा राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक न्याय श्रेणीमध्ये श्रम उत्पादकता, कामगारांचे वेतन, सार्वजनिक खर्च, सामाजिक सुरक्षा जाळे आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तर राजकीय न्यायामध्ये ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकारांचे हस्तांतरण, गुन्हेगारीच्या घटना यासारख्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकारामध्ये गोवा राज्याला शेवटच्या स्थान मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: चांदीची चमक अन् मंगळाची साथ! 'या' राशीसाठी 2026 ठरणार गेम चेंजर; प्रबळ नशिबासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

SCROLL FOR NEXT