Rajyasabha Poll 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Rajyasabha Poll: गोव्यातील राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

गोवा विधानसभा संकुलात 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडेल

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Rajyasabha Election: गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार आहे, हे यापुर्वीच जाहीर झाले आहे. आता या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे.

गोवा विधानसभेच्या सचिव, निवडणुकीच्या रिटर्निंग ऑफिसर नम्रता उलमान यांनी आज या निवडणुकीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार 24 जुलै रोजी व्हीआयपी ब्लॉक, गोवा विधानसभा संकुल, पर्वरी येथे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडेल.

उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत 13 जुलै आहे, 14 जुलै रोजी अर्जांची छाननी होईल आणि 17 जुलै ही माघारीची अंतिम तारीख आहे. 24 जुलै रोजी मतदान पार पडेल. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदार मतदान करत असतात.

गोव्यातून राज्यसभेत एक खासदार निवडून जातो. भाजप नेते विनय तेंडुलकर हे गोव्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा राज्यसभेचा 6 वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे.

31 जुलै 2017 रोजी ते राज्यसभेवर निवडून गेले होते. तेंडुलकर यांची खासदारकीची मुदत येत्या 28 जुलै रोजी संपत आहे.

दरम्यान, सध्या या जागेसाठी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे. तर विरोधी पक्षांकडून मात्र अद्याप कुणाचेही नाव समोर आलेले नाही. विधानसभेतील संख्याबळ पाहता, ही जागा भाजप पुन्हा सहज जिंकले, अशी परिस्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT