Rajesh Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Rajesh Phaldesai: बायंगिणीतील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली तरी 'त्या' प्रकल्पाला विरोधच

आमदार राजेश फळदेसाई: आठ हजार लोकवस्तीला धोकादायक

गोमन्तक डिजिटल टीम

Rajesh Phaldesai बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती उभी राहिली आहे. या परिसरात सुमारे सात ते आठ हजाराहून लोक राहत असल्याने हा प्रकल्प तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतो.

या प्रकल्पामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बायंगिणी येथे हा प्रकल्पाला ठाम विरोध असेल तसेच तो या ठिकाणी कोणत्याच परिस्थितीत येऊ दिला जाणार नाही, असे ठाम मत कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी व्यक्त केले.

बायंगिणी येथे मोठ्या प्रमाणात बांधकामे येत आहेत. तसेच अनेक लोक या ठिकाणी सदनिका खरेदी करत आहेत.

काहींनी स्वतःची घरे बांधली आहेत, अशा परिस्थितीत हा कचरा प्रकल्प या ठिकाणी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तसेच लोकांना तेथे राहणेही मुश्कील होणार आहे.

बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाच्या कामावेळी तेथील स्थानिकांनी वेळोवेळी विरोध केला आहे. त्यामुळे त्या विरोधाला माझा पाठिंबा असेल. या बायंगिणी येथील परिसराचा विकास होत आहे. मोठमोठी बांधकामे उभी राहत आहेत.

त्यामुळे तेथे वास्तव्य करत असलेल्या तसेच पुढील काळात येथे उभे राहणाऱ्या वस्तीतील लोकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जाऊ लागू नये म्हणून आतापासूनच त्याला विरोध करण्यात येणार आहे.

सरकारने तो लादण्याचा प्रयत्न केल्यास या परिसरात नागरिक रस्त्यावर उतरतील व त्यांच्याबरोबर आपण राहू असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वीच पणजीचे आमदार व मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी बायंगिणीचा कचरा प्रकल्प ठरल्यानुसार होणार आहे. त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पामुळे जी कचरा समस्या तिसवाडी तालुक्यामध्ये भेडसावत आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणे आवश्‍यक आहे.

कचरा कोठे टाकायचा?

मोन्सेरात म्हणाले, बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठीची जागा तेथे वस्ती उभी राहण्यापूर्वी निवडण्यात आली होती. त्यामुळे ज्या विकासकांनी या ठिकाणी जागे घेऊन इमारती बांधून त्यातील सदनिका विकल्या असल्या तरी त्यांना या प्रकल्पाबाबतची पूर्वकल्पना होती.

त्यामुळे लोकांनीही सदनिका खरेदी करण्यापूर्वी त्याचा विचार करण्याची गरज होती. कचरा प्रकल्पासाठी निवड झालेल्या जागांना विरोध होत राहिला तर हा कचरा कोठे टाकायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT