Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पाऊस मंदावला! यलो अलर्ट जारी; राज्यावर पाणीटंचाईची टांगती तलवार

Goa Monsoon: मागील २४ तासांत राज्यात अतिशय तुरळक पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात २०४१ मिमी म्हणजेच ८०.३७ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यात पाऊस मंदावला असून ही स्थिती कायम राहिल्यास राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण सद्यस्थितीत सरासरी पावसाच्या तुलनेत ७.६ टक्के पावसाचा तुटवडा नोंदविण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन-तीन दिवस अतिशय तुरळक पाऊस पडणार असून १३ आणि १४ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागील २४ तासांत राज्यात अतिशय तुरळक पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात २०४१ मिमी म्हणजेच ८०.३७ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील २४ तासांत सांगे, पणजी आणि सांखळीत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

राज्यात आत्तापर्यंत ८० इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात देखील तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हॉटेलच्या इमारतीवरून पडून 18 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, वागातोरमध्ये मध्यरात्री दुर्घटना; पोलीस तपास सुरू

Goa Crime: बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या शोधात गोवा पोलिसांनी गाठले रायचूर, सुखरुप सुटका करत संशयिताला ठोकल्या बेड्या; पुढील तपास सुरु

Viral Post: भारतातच नाही तर थेट बलोचमध्येही 'खन्नाची हवा'; दिग्गज नेते झालेत फॅन, म्हणाले "हा तर हुबेहूब..."

अग्रलेख: हडफड्याच्या अग्निकांडाचा उगम कझाकस्थानात? कझाकी नर्तिकेचं नृत्य नसतं तर क्लबला आग लागली नसती?

Goa Live News: फोंडा राजकारणात मोठा ट्विस्ट; डॉ. केतन भाटीकर आणि कार्यकर्त्यांचा मगोपला 'राम राम'

SCROLL FOR NEXT