Goa Rain Sanguem Dainik Gomantak
गोवा

कुयणामळ सांगेत घरात झिरपू लागले पाणी

पावसाच्या पाण्यामुळे घरातील सामानाची हानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

सांगे : गेले चार दिवस सांगे भागात पडत असलेल्या धुव्वाधार पावसामुळे कुयणामळ सांगे येथील शिरोडकर यांच्या घरात पावसाचे पाणी झिरपून वाहू लागल्याने कुटुंबीयांना नातलगांच्या घरी जावे लागले असून पावसाच्या पाण्यामुळे घरातील सामानाची हानी झाली आहे.

शिरोडकर यांचे घर हे साठ वर्षे जुने असून संपूर्ण घर मातीचे असल्यामुळे भीती खालून पाण्याचे झरे घरातून वाहू लागल्याने घरात सर्वत्र गुडघाभर पाणी वाहू लागलें आहे. सकाळी सांगेचे मामलेदार राजेश साखळकर यांनी या घटनेची पाहणी केली आहे. शिरोडकर कुटुंबीयांनी यावर उपाय काढून आम्हाला सुरक्षा द्यावी,अशी मागणी केली आहे. शिरोडकर कुटुंबीय रहात असलेल्या घराच्या मागील बाजूस खडकाळ व उंचवटा असलेला भाग असल्याने पावसाचे पाणी घराच्या बाजूने वाहून येत आहे.

पाण्याचे झरे घराखालून वाट वाहू लागल्याने मातीच्या घराला धोका निर्माण झाला आहे. या घरात पाच कुटुंबे राहतात. पण पाचही घरातून नैसर्गिक झऱ्याप्रमाणे पाणी वाहून जात आहे. चौदा वर्षांपूर्वी असाच पाण्याचा प्रवाह घरातून वाहत होता त्यावेळी उपाय योजना केली असती तर अशी घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया दीपक शिरोडकर यांनी व्यक्त केली. शिवयोद्धा संघटनेचे अध्यक्ष विनेश प्रभुदेसाई यांनी घटनास्थळी पाहणी करून घराला धोका संभवित असून सरकारने तातडीने सुरक्षा उपाय योजावेत,अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT