Goa Rain Forecast Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Forecast: गोव्यासह महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून 4 दिवस पावसाची शक्यता; IMD चा अंदाज

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस पडणार

Akshay Nirmale

Goa Rain Forecast: मॉन्सूनने माघार घेऊन बराच काळ लोटलेला असला तरी बदलत्या हवामानामुळे पावसाचा हंगाम संपल्यानंतरही अचानक पावसाला अनुकूल स्थिती झाल्यानंतर पाऊस कोसळतो.

आगामी दिवसात 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या काळात गोव्यासह महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) गोव्यासाठी 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात गडगडाटी पाऊस कोसळू शकतो, वीजा पडू शकतात आणि वारे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहतील, असे म्हटले आहे. 'यलो अलर्ट' हा नागरिकांनी जागरूक आणि सज्ज राहावे, यासाठी असतो.

ओलावा असलेल्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील कोकण प्रदेश आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात 23 ते 27 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

IMD च्या पुणे कार्यालयातील हवामान अंदाज विभाग प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, पाऊस पडेल असे जे क्षेत्र आहे त्यात मुंबई आणि त्याच्या लगतचे जिल्हे तसेच कोकण प्रशासकीय विभाग आणि गोव्याचा यात समावेश आहेच.

शिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT