Railway Accident Dainik Gomantak
गोवा

Railway Accident: घाई आहे, पण थोडं सबुरीनं घ्या! तुमचा आततायीपणा ठरतोय रेल्‍वे अपघाताचे कारण, तरुणांचे जास्त बळी

वर्षाला सरासरी 47 जणांना मृत्‍यू; मद्यप्राशन प्रमुख कारण

गोमन्तक डिजिटल टीम

Railway Accident रेल्‍वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दाखविलेला हलगर्जीपणा, रेल्‍वे मार्गाला कुंपण नसल्‍याने, पादचाऱ्यांकडून पुरेशी काळजी न घेता रेल्‍वे मार्ग ओलांडण्‍याचा केलेला प्रयत्‍न यामुळे गोव्‍यात रेल्‍वेमुळे होणारे अपघात वाढले आहेत.

२०१७ ते २०२२ पर्यंतची आकडेवारी पाहिल्‍यास प्रत्‍येक वर्षी सरासरी ४७ लोकांना रेल्‍वेच्‍या कक्षेत येणाऱ्या मार्गावर मृत्‍यू येतो, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

पेडणे ते काणकोणदरम्‍यान गोव्‍यातील काेकण रेल्‍वेचा मार्ग असून याच मार्गावर सर्वांत जास्‍त अपघात होतात, हे दिसून आले आहे. यंदा जून महिन्‍यापर्यंत जी आकडेवारी उपलब्‍ध झाली आहे.

त्‍यानुसार, रेल्‍वेच्‍या अखत्‍यारितील मार्गावर 25 जणांना मृत्‍यू आला असल्‍याचे उघड झाले आहे. त्‍यापैकी सहा जणांनी रेल्‍वेखाली उडी घेऊन आत्‍महत्‍या केली तर 13 जणांना रेल्‍वेची धडक बसल्‍याने मृत्‍यू आला. सहा जणांना रेल्‍वे स्‍थानकावर मृत्‍यू आल्‍याचे नोंद झाले आहे.

या अपघातात मरणारे बहुतेक 30 ते 50 वयोगटातील असल्‍याचे दिसून आले आहे. याची कारणे शोधून काढण्‍याचा प्रयत्‍न केला असता, दारू पिलेल्‍या अवस्‍थेत रुळ ओलांडताना बहुतेकांचा बळी गेला आहे.

रेल्‍वे रुळावर कुणी येऊ नयेत यासाठी आम्‍ही आमच्‍यापरीने पूर्ण काळजी घेत आहोत, तरीही आमचा डोळा चुकवून लोक रुळ ओलांडतात. त्‍यामुळे असे अपघात घडतात, अशी माहिती आपले नाव न उघड करण्‍याच्‍या अटीवर एका रेल्‍वे पाेलिस अधिकाऱ्याने दिली.

मृत्‍यूंची आकडेवारी लक्षवेधी

2017 पासूनची आकडेवारी तपासली तर प्रत्‍येक वर्षी हे प्रमाण खाली-वर झालेले दिसते. 2017 साली या मार्गावर 50 जणांना मृत्‍यू आला होता. 2018 साली तो आकडा 43 वर पोहोचला. तर 2019 साली 57 जणांना रेल्‍वे मार्गावर मृत्‍यू आला.

2021 साली या मार्गावर 46 जणांना मृत्‍यू आला होता. 2022 साली अपघाती मृत्‍यूचे प्रमाण 59 एवढे प्रचंड होते. ही आकडेवारी लक्ष वेधण्‍यासारखी असून हे मृत्‍यू कमी व्‍हावेत यासाठी रेल्‍वेने उपाययोजना करण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT