paragliding criminal case Dainik Gomantak
गोवा

Goa Paragliding: पॅराग्लायडिंग दुर्घटनेनंतर एका व्यक्तीवर गुन्हा दाखल; दुर्दैवी प्रकार टळला असता? पंचायतीच्या याचिकेकडे दुर्लक्ष

Querim Paragliding Accident Death: या संबंधात मांद्रे पोलिसांनी बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या शेखर नामक व्यक्तीवर गुन्हा नोंदवला आहे

Akshata Chhatre

Goa Accident: दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाल्यानंतर केरी (पेडणे) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर पॅराग्लायडिंग व्‍यवसायाची पोलखोल झालीये आणि आता या संबंधात मांद्रे पोलिसांनी बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या शेखर नामक व्यक्तीवर गुन्हा नोंदवला आहे. शिवाय या घटनेमधून पर्यटक अधिकारी उपस्थित असतानाही बेकायदा पॅराग्लायडिंग सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

केरी परिसरात विना परवाने असे बेकायदेशीर व्यवसाय सुरु आहेत, आणि या व्यवसायांवर बंदी घालण्यासाठी काही दिवसांपूर्वी केरी पंचायतीने एक बैठक घेतली होती. या बैठकीत केरीच्या समुद्रकिनाऱ्यावर सरकारने पॅराग्लायडिंग व्‍यवसायाला परवानगी देऊ नये असा ठराव मंजूर करण्यात आला होता आणि हाच ठराव संबंधीत खात्यात पाठ्वण्यात आला होता, मात्र अजूनही यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी यापूर्वी देखील बेकायदेशीर पॅराग्लायडिंग व्यवसायांना टाळा ठोकावा अशी मागणी केली होती. गोव्याला लोकं पर्यटकांचं एक प्रेक्षणीय स्थळ मानतात आणि अशा काही घटनांमुळे गोव्याच्या पर्यटनाचे चित्र खराब होते, म्हणूनच राज्य सरकारने वेळीच यावर उपाय करण्याची गरज आहे.

सरपंच धरती नागोजी यांनी व्यक्त केला शोक

घडलेल्या प्रकरणावर केरीच्या सरपंच धरती नागोजी यांनी शोक व्यक्त केला. त्या म्हणाल्या की अशा बेकायदेशीर पॅराग्लायडिंगचे व्यवसाय थांबावे आणि केरी गावात असे प्रकार नको म्हणून पंचायतीकडून वेळीच याचिका दाखल करण्यात आली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून यावर कारवाई केलेली नाही. हे पॅराग्लायडिंगचे व्यावसायिक पाली किंवा हरमल या शेजारी गावांमध्ये हा व्यवसाय चालवतात मात्र त्याचं लेन्डिंग मात्र केरीत होत असल्याने गावाचं नाव खराब होत आहे.

एकूण प्रकरण काय?

पुणे येथील काही पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी केरी डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेले होते. त्यावेळी पायलट सुमन नेपाळी आणि पुणे येथील पर्यटक शिवानी दाभळे हे दोघे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही दुर्घटना शनिवारी (दि. १८ जानेवारी) दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी मांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT