Quepem Sewage Inspection Dainik Gomantak
गोवा

Quepem: केपेतील इमारतींतील सांडपाणी उघड्यावर, अधिकाऱ्यांकडून पाहणी

Quepem Sewage Inspection: इमारतींतील सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून आले, असे केपे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाब्तीस्ता यांनी सांगितले.

Sameer Panditrao

Quepem Sewage Inspection

केपे: येथील पालिका बाजारासमोर असलेल्या तीन रहिवासी इमारतीतील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच व्यवस्था न केल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाणी उघड्या जागेत वाहत आहे. श्रीपाद शेटकर यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित खात्यांना निवेदन सादर लक्ष वेधल्यानंतर सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, केपे प्राथमिक आरोग्य केंद्र व केपे पालिकेतर्फे संयुक्त पाहणी करण्यात आली.

यावेळी इमारतींतील सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसून आले, असे केपे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाब्तीस्ता यांनी सांगितले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साईश वळडणकर, केपे पालिकेचे अभियंता नितीन कोठारकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाब्तीस्ता व श्रीपाद शेटकर उपस्थित होते.

परिसरात घाणीचे साम्राज्य : शेटकर

कुसमण भागात असलेल्या या रहिवासी इमारती शेत जमिनीत बांधल्या असून मात्र या इमारतींत सांडपाण्याचा निचरा व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हा विषय वेळोवेळी उपस्थित करूनही संबंधित खाते तसेच केपे पालिकेने कधी लक्ष न दिल्याने आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून या इमारतींच्या सोकपिटची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संयुक्त पाहणी केली असल्याचे श्रीपाद शेटकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT