Goa News | Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: पाणी बिल थकबाकीदारांसाठी वन टाईम सेटलमेंट ऑनलाईन योजना 1 जानेवारीपासून

बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांची माहिती; राज्यातील थकबाकी 45 कोटीवर

Akshay Nirmale

Nilesh Cabral: राज्यात पाणी बिलांची थकबाकी सुमारे 45 कोटीवर आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने येत्या 1 जानेवारीपासून ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) ऑनलाईन योजना लागू केली आहे, अशी माहिती बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी दिली.

ही थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी या योजनेत हप्त्यानुसार बिलाच्या व्याजावर सवलत दिली जाईल. या योजनेचा लाभ न घेतल्यास फेब्रुवारीपासून पाणी बिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल.

पाणी पुरवठा खात्यातर्फे ग्राहकांना तसेच कंपन्यांना पाण्याची बिले देऊनही ती वेळेवर भरली जात नाहीत. पाणी मीटर बंद पडल्याचे तसेच पाणी पुरवठा होत नसल्याची कारणे देऊन काहींनी ही बिले भरलेली नाहीत. मुबलक पाणी न मिळता पाण्याची बिले मात्र भरमसाट येतात असा काहींचा दावा आहे. त्यामुळे ही बिले भरण्यासाठी खात्याने OTS योजना जारी केली आहे. ही योजना ऑनलाईन असून ती जानेवारी महिन्यापुरतीच लागू असेल.

जानेवारी महिन्यात ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्यांनी ही नोंदणी केलेली नसेल त्यांना तो लाभ मिळणार नाही. त्या थकबाकीदारांविरुद्ध खात्यातर्फे त्वरित कारवाईला सुरुवात केली जाईल, अशी माहिती काब्राल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT