Goa PWD Illegal Promotion Case Dainik Gomantak
गोवा

Goa PWD: पीडब्ल्यूडीमधील 'ती' पदोन्नती बेकायदेशीर; सरकारला नोटीस, अधिकारांचा गैरवापर केल्‍याचा मुख्य अभियंत्यांवर आरोप

Goa PWD Illegal Promotion Case: पदोन्नती नियम, सेवा ज्येष्ठता आणि घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सार्वजनिक बांधकाम खात्यातील ‘अभियंता अधिकारी’ पदावर करण्यात आलेली पदोन्नती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारसह सार्वजनिक बांधकाम खाते, गोवा लोकसेवा आयोग, संतोष भिमेगौडा आणि प्रधान मुख्‍य अभियंता उत्तम पार्सेकर यांना नोटीस बजावली आहे. साहाय्यक अभियंता श्रेणीतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांनी संतोष भिमेगौडा यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीला आव्हान दिले आहे. ही पदोन्नती नियम, सेवा ज्येष्ठता आणि घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

तसेच पदोन्नती आदेश आणि संबंधित परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली असून कार्यकारी अभियंता अधिकारी हे पद केवळ सेवा ज्येष्ठता आणि नियमांनुसारच भरण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

ॲड. सिमरन काणेकर यांनी सांगितले की, ही पदोन्नती एका ‘गुप्त’ परिपत्रकाद्वारे करण्यात आली, ज्याची व्यापक प्रसिद्धी करण्यात आली नव्हती. त्‍यामुळे पात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्जाच्या संधीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा याचिकेत केला आहे.

तसेच या पदासाठी निवड समितीची स्थापना नियमांनुसार करण्यात आली नव्हती. संपूर्ण प्रक्रिया उत्तम पार्सेकर यांनी विशिष्ट हेतूने आणि अधिकारांचा गैरवापर करून राबवल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT