ओशेलात आयोजित गौरव सोहळ्यात सहभागी विद्यार्थी, सोबत मंत्री मायकल लोबो, पर्राच्या सरपंच दिलायला लोबो तसेच ओशेल पंचायत मंडळ  संतोष गोवेकर
गोवा

Goa: आव्हानांचा डोंगर पेलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवा

यापुढे दरवर्षीच विद्यार्थी गौरव सोहळा आयोजनाचा विचार असल्याचे मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) सांगितले.शिवोली मतदार संघ विकासकामांच्या बाबतीत खूपच मागे असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले.

दैनिक गोमन्तक

शिवोली: आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यासमोर नवनवीन आव्हाने (New challenges for students) आहेत त्यामुळे या आव्हानांना (Challenges) सामोरे जाण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवणे आवश्यक आहे. मुलांच्या पालकांबरोबरच सामाजिक संस्था तसेच गांवोगावच्या पंचायत मंडळांकडून अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी घडवून आणावे असे आवाहन कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Rural Development Minister Michael Lobo) यांनी ओशेलात केले.

ओशेल पंचायत मंडळातर्फे पंचक्रोशीतील दहावी तसेच बारावीच्या विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात मंत्री लोबो बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे उप-जिल्हाधिकारी दिपक वायंगणकर,  पर्रा गांवच्या सरपंच दिलायला लोबो, ओशेलच्या सरपंच वंदना नार्वेकर, उपसरपंच प्रवीण कोचरेकर, पंच सदस्य महादेव हरमलकर, मंगेश चोडणकर, नुतन बाणावलीकर, अड. रेशल आरपोरकार तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबुसो वायंगणकर उपस्थित होते.

पर्राच्या सरपंच दिलायला लोबो यांनी शिवोली मतदार संघ विकासकामांच्या बाबतीत खूपच मागे असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. यापुढे दरवर्षीच विद्यार्थी गौरव सोहळा आयोजनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री मायकल लोबो तसेच दिलायला लोबो यांच्याहस्ते ओशेल पंचायत क्षेत्रातील एकुण 34 विद्यार्थी- विद्यार्थीनींचा जाहीर गौरव करण्यात आला. सुरुवातीला समई प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी सरपंच वंदना नार्वेकर यांनी पाहुण्यांचे शब्दरुपी स्वागत केले. पंच सदस्य मंगेश चोडणकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात ओशेल पंचायतीच्या इतिहासात स्थानिक विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतलेल्या मंत्री मायकल लोबो तसेच दिलायला लोबो यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार संतोष गोवेकर यांनी तर मंगेश चोडणकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT